T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : मोहम्मद रिझवानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये अपयश आले. दोन जीवदान मिळूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही. १९९२च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या पुनरावृत्तीच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरावे लागणार आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मार्क वूड व डेवीड मलान यांना तंदुरुस्तीच्या कारणास्तव फायनलमध्येही खेळता येणार नाही. त्यामुळे इंग्लंडने उपांत्य फेरीतील संघ कायम राखण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही कोणताच बदल झालेला नाही.
खेळाडूच्या अचानक निधनाने इंग्लंडच्या संघावर शोककळा; काळी फित बांधून उतरले मैदानावर
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात फायनलमध्ये टॉस जिंकणाऱ्या संघांनी ७ पैकी ६ वेळा विजय मिळवले आहेत. २००९मध्ये पाकिस्तानने नाणेफेक गमावूनही जेतेपद उंचावले होते आणि यंदाही त्यांच्या चाहत्यांना या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. बेन स्टोक्सने No Ball, Wide Ball ने इनिंग्जची सुरुवात केली. त्यामुळे पाकिस्तानला पहिलाच चेंडू फ्री हिट मिळाला, परंतु स्टोक्सने मोहम्मद रिझवानला त्याचा फायदा उचलू दिला नाही. चौथ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनचा डायरेक्ट हिट चूकला अन् रिझवानला जीवदान मिळाले. १९९२च्या वर्ल्ड कपमध्येही नो बॉलने पाकिस्तानच्या धावांची बोहनी झाली होती आणि आजही तसेच झाले.
रिझवान व बाबर यांनी हळुहळू धावांचा वेग वाढवण्यास सुरुवात केली, पण त्याचवेळी इंग्लंडने हुकूमी एक्का काढला. सॅम कुरनने त्याच्या पहिल्याच षटकात रिझवानचा ( १५) त्रिफळा उडवून पाकिस्तानला धक्का दिला. रिझवान यापूर्वी दोन वेळा रन आऊट होता होता वाचला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup Final ENG vs PAK Live : Sam Curran gets Mohammad Rizwan for 15 and Pakistan 29 for 1, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.