Join us  

T20 World Cup Final ENG vs PAK: "सगळ्यांना बॅटिंग मिळाली अजून काय हवं", पाकिस्तानच्या पराभवानंतर मीम्सचा पाऊस

आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २०२२च्या विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 6:26 PM

Open in App

मेलबर्न : आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २०२२च्या विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. इंग्लंडने पाच गडी राखून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि विश्वचषकावर नाव कोरले. पाकिस्तानच्या ८ बाद १३७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. आदिल राशिद, स‌ॅम करन, ख्रिस जॉर्डन या गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर बेन स्टोक्सने ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह नाबाद ५२ धावा  करून इंग्लंडचा विजय पक्का केला. एकदिवसीय आणि टी-२० असे दोन्ही वर्ल्ड कप जेतेपद एकाच वेळी कायम राखणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. 

आजच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. इंग्लंडला टी-२० विश्वचषकाचा नवा चॅम्पियन होण्यासाठी १३८ धावांची आवश्यकता होती. बेन स्टोक्सने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाने किताब पटकावला आहे. पाकिस्तानच्या खराब फलंदाजीमुळे शेजाऱ्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. 

पाकिस्तानचे फलंदाज अयशस्वीपाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ १३७ धावा केल्या आहेत. यामध्ये ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. त्याच्या पाठोपाठ कर्णधार बाबर आझम ३२ धावांची साजेशी खेळी केली. तर शादाब खानने २० धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या तिघांशिवाय कोणत्याच पाकिस्तानी फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. सॅम करनने सर्वाधिक ३ बळी पटकावून पाकिस्तानला मोठे झटके दिले. आदिल राशिद आणि ख्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. तर बेन स्टोक्सला १ बळी घेण्यात यश आले. 

पाकिस्तानने ११ षटकांत २ बाद ८४ धावा केल्या होत्या, परंतु पुढील ९ षटकांत त्यांनी ५३ धावांत ६ बळी गमावले. पाकिस्तानच्या १३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात शाहिन शाह आफ्रिदीला ( Shahin Afridi) दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि मोईन अली ( Moeen Ali) यांनी हात मोकळे करताना इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले. इंग्लिश संघाने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा करून विजय मिळवला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ४९ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ. 

आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ -जोस बटलर (कर्णधार), ॲलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानइंग्लंडऑफ द फिल्डमिम्स
Open in App