T20 World Cup Final ENG vs PAK Live : भारत अजून इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेला नाही; पाकिस्तानी अभिनेत्रीचं वादग्रस्त विधान

T20 World Cup Final England vs Pakistan: इंग्लंडने दमदार खेळ करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. मेलबर्नवर झालेल्या फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 06:26 PM2022-11-13T18:26:07+5:302022-11-13T18:26:54+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup Final ENG vs PAK Prize money : Celebration in India actually reveals they never came out of British slavery, Pakistani actress Sehar Shinwari controvercial tweet | T20 World Cup Final ENG vs PAK Live : भारत अजून इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेला नाही; पाकिस्तानी अभिनेत्रीचं वादग्रस्त विधान

T20 World Cup Final ENG vs PAK Live : भारत अजून इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेला नाही; पाकिस्तानी अभिनेत्रीचं वादग्रस्त विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Final England vs Pakistan: इंग्लंडने दमदार खेळ करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. मेलबर्नवर झालेल्या फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानच्या ८ बाद १३७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. भारतीय संघ फायनलला जाईल या आशेने अनेक चाहत्यांनी तिकीट खरेदी केलं होतं आणि ते पाकिस्तान-इंग्लंड लढत पाहण्यासाठी टीम इंडियाच्या जर्सीत मैदानावर पोहोचले. पाकिस्तान-इंग्लंडच्या राष्ट्रीय ध्वजात भारताचा तिरंगाही डौलाने फडकत होता. त्यात पाकिस्तानचा पराभव झाल्याने भारतीय चाहत्यांवर राग निघताना दिसतोय.. पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी ( Sehar Shinwari) हिने आजच्या निकालानंतर वादग्रस्त विधानांची मालिका सुरू केली. 

पाकिस्तानच्या पराभवानंतर मोहम्मद शमीने Shoaib Akhtarला हाणला सणसणीत टोमणा


मोहम्मद रिझवान ( १५), मोहम्मद हॅरीस ( ८), इफ्तिखार अहमद (०) हे आज अपयशी ठरले. कर्णधार बाबर आजम ( ३२) आणि शान मसूद ( ३८) हे पाकिस्तानच्या आजच्या डावातील टॉप स्कोअरर ठरले. सॅम करनने १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  रशीदने ४-१-२२-२ आणि ख्रिस जॉर्डनने ४-०-२७-२ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. पाकिस्तानने ११ षटकांत २ बाद ८४ धावा केल्या होत्या, परंतु पुढील ९ षटकांत त्यांनी ५३ धावांत ६ विकेट्स गमावल्या. 

पाकिस्तानच्या १३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात शाहिन आफ्रिदीला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि मोईन अली ( Moeen Ali) यांनी हात मोकळे करताना इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले.  इंग्लंडकडून जोस बटलर ( २६), मोईन अली ( १९) व हॅरी ब्रुक ( २०) यांनी चांगला खेल केला. फिल सॉल्ट( १०), अॅलेक्स हेल्स ( १) यांनी निराश केले. स्टोक्सने ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह नाबाद ५२ धावा  करून इंग्लंडचा विजय पक्का केला.   


शिनवारी हीने ट्विट केले की, भारतीय अजून इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेले नाहीत.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

Web Title: T20 World Cup Final ENG vs PAK Prize money : Celebration in India actually reveals they never came out of British slavery, Pakistani actress Sehar Shinwari controvercial tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.