T20 World Cup Final England vs Pakistan: इंग्लंडने दमदार खेळ करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. मेलबर्नवर झालेल्या फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानच्या ८ बाद १३७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. भारतीय संघ फायनलला जाईल या आशेने अनेक चाहत्यांनी तिकीट खरेदी केलं होतं आणि ते पाकिस्तान-इंग्लंड लढत पाहण्यासाठी टीम इंडियाच्या जर्सीत मैदानावर पोहोचले. पाकिस्तान-इंग्लंडच्या राष्ट्रीय ध्वजात भारताचा तिरंगाही डौलाने फडकत होता. त्यात पाकिस्तानचा पराभव झाल्याने भारतीय चाहत्यांवर राग निघताना दिसतोय.. पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी ( Sehar Shinwari) हिने आजच्या निकालानंतर वादग्रस्त विधानांची मालिका सुरू केली.
पाकिस्तानच्या पराभवानंतर मोहम्मद शमीने Shoaib Akhtarला हाणला सणसणीत टोमणा
मोहम्मद रिझवान ( १५), मोहम्मद हॅरीस ( ८), इफ्तिखार अहमद (०) हे आज अपयशी ठरले. कर्णधार बाबर आजम ( ३२) आणि शान मसूद ( ३८) हे पाकिस्तानच्या आजच्या डावातील टॉप स्कोअरर ठरले. सॅम करनने १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. रशीदने ४-१-२२-२ आणि ख्रिस जॉर्डनने ४-०-२७-२ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. पाकिस्तानने ११ षटकांत २ बाद ८४ धावा केल्या होत्या, परंतु पुढील ९ षटकांत त्यांनी ५३ धावांत ६ विकेट्स गमावल्या.
पाकिस्तानच्या १३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात शाहिन आफ्रिदीला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि मोईन अली ( Moeen Ali) यांनी हात मोकळे करताना इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले. इंग्लंडकडून जोस बटलर ( २६), मोईन अली ( १९) व हॅरी ब्रुक ( २०) यांनी चांगला खेल केला. फिल सॉल्ट( १०), अॅलेक्स हेल्स ( १) यांनी निराश केले. स्टोक्सने ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह नाबाद ५२ धावा करून इंग्लंडचा विजय पक्का केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"