T20 World Cup Final ENG vs PAK Live : पाकिस्तानच्या पराभवानंतर मोहम्मद शमीने Shoaib Akhtarला हाणला सणसणीत टोमणा

T20 World Cup Final England vs Pakistan Prize money : इंग्लंडने दमदार खेळ करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. मेलबर्नवर झालेल्या फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 06:00 PM2022-11-13T18:00:17+5:302022-11-13T18:00:50+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup Final ENG vs PAK Prize money : 'It's called karma': Mohammad Shami hits back at Shoaib Akhtar after Pakistan lost to England | T20 World Cup Final ENG vs PAK Live : पाकिस्तानच्या पराभवानंतर मोहम्मद शमीने Shoaib Akhtarला हाणला सणसणीत टोमणा

T20 World Cup Final ENG vs PAK Live : पाकिस्तानच्या पराभवानंतर मोहम्मद शमीने Shoaib Akhtarला हाणला सणसणीत टोमणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Final England vs Pakistan Prize money : इंग्लंडने दमदार खेळ करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. मेलबर्नवर झालेल्या फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानच्या ८ बाद १३७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. आदिल रशीद, स‌ॅम करन, ख्रिस जॉर्डन या गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर बेन स्टोक्सने ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह नाबाद ५२ धावा  करून इंग्लंडचा विजय पक्का केला. वन डे आणि ट्वेंटी-२० असे दोन्ही वर्ल्ड कप जेतेपद एकाच वेळी कायम राखणारा पहिला संघ ठरला.  पाकिस्तानच्या या पराभवानंतर माजी गोलंदाज शोएब अख्तरन ( Shoaib Akhtar) तुटलेल्या हृदयाचे सिम्बॉल पोस्ट केला आणि त्यावर भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammad Shami) ने त्याला सणसणीत टोमणा हाणला. 

जेतेपदही गेलं अन् १३ खोकेही! जाणून घ्या पाकिस्तानच्या वाट्याला किती आली बक्षिसाची रक्कम 



मोहम्मद रिझवान ( १५), मोहम्मद हॅरीस ( ८), इफ्तिखार अहमद (०) हे आज अपयशी ठरले. कर्णधार बाबर आजम ( ३२) आणि शान मसूद ( ३८) हे पाकिस्तानच्या आजच्या डावातील टॉप स्कोअरर ठरले. सॅम करनने १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  रशीदने ४-१-२२-२ आणि ख्रिस जॉर्डनने ४-०-२७-२ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. पाकिस्तानने ११ षटकांत २ बाद ८४ धावा केल्या होत्या, परंतु पुढील ९ षटकांत त्यांनी ५३ धावांत ६ विकेट्स गमावल्या. पाकिस्तानच्या १३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात शाहिन शाह आफ्रिदीला ( Shahin Afridi) दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि मोईन अली ( Moeen Ali) यांनी हात मोकळे करताना इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले. 

 इंग्लंडकडून जोस बटलर ( २६), मोईन अली ( १९) व हॅरी ब्रुक ( २०) यांनी चांगला खेल केला. फिल सॉल्ट( १०), अॅलेक्स हेल्स ( १) यांनी निराश केले.  या पराभवानंतर अख्तरच्या ट्विटला शमीने जोरदार प्रत्युत्तर दिले. 
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

Web Title: T20 World Cup Final ENG vs PAK Prize money : 'It's called karma': Mohammad Shami hits back at Shoaib Akhtar after Pakistan lost to England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.