T20 World Cup Final England vs Pakistan Prize money : इंग्लंडने दमदार खेळ करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. मेलबर्नवर झालेल्या फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानच्या ८ बाद १३७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. आदिल रशीद, सॅम करन, ख्रिस जॉर्डन या गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर बेन स्टोक्सने ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह नाबाद ५२ धावा करून इंग्लंडचा विजय पक्का केला. वन डे आणि ट्वेंटी-२० असे दोन्ही वर्ल्ड कप जेतेपद एकाच वेळी कायम राखणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तानच्या या पराभवानंतर माजी गोलंदाज शोएब अख्तरन ( Shoaib Akhtar) तुटलेल्या हृदयाचे सिम्बॉल पोस्ट केला आणि त्यावर भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammad Shami) ने त्याला सणसणीत टोमणा हाणला.
जेतेपदही गेलं अन् १३ खोकेही! जाणून घ्या पाकिस्तानच्या वाट्याला किती आली बक्षिसाची रक्कम
इंग्लंडकडून जोस बटलर ( २६), मोईन अली ( १९) व हॅरी ब्रुक ( २०) यांनी चांगला खेल केला. फिल सॉल्ट( १०), अॅलेक्स हेल्स ( १) यांनी निराश केले. या पराभवानंतर अख्तरच्या ट्विटला शमीने जोरदार प्रत्युत्तर दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"