T20 World Cup Final England vs Pakistan Prize money : २०१६मध्ये बेन स्टोक्सच्या अखेरच्या षटकात कार्लोस ब्रेथवेटने मारलेले खणखणीत चार षटकार वेस्ट इंडिजला जगज्जेता बनवणारे ठरले. पण, २०२२मध्ये स्टोक्सने २०१६च्या फायनलची सल भरून काढली आणि इंग्लंडला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून दिली. स्टोक्सने ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह नाबाद ५२ धावा केल्या आणि इंग्लंडचा ५ विकेट्स राखून विजय पक्का केला. वन डे आणि ट्वेंटी-२० असे दोन्ही वर्ल्ड कप जेतेपद एकाच वेळी कायम राखणारा पहिला संघ ठरला.
मोहम्मद रिझवान ( १५), मोहम्मद हॅरीस ( ८), इफ्तिखार अहमद (०) हे आज अपयशी ठरले. कर्णधार बाबर आजम ( ३२) आणि शान मसूद ( ३८) हे पाकिस्तानच्या आजच्या डावातील टॉप स्कोअरर ठरले. पाकिस्तानने १५ षटकांत ४ बाद १०६ धावा केल्या होत्या आणि मसूद व शादाब खान फटकेबाजी करत होते. सॅम करनने ही डोईजड झालेली जोडी तोडली. मसूद ३८ धावांवर बाद झाला. सॅम करन हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात इंग्लंडकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. रशीदने ४-१-२२-२ आणि ख्रिस जॉर्डनने ४-०-२७-२ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. पाकिस्तानने ११ षटकांत २ बाद ८४ धावा केल्या होत्या, परंतु पुढील ९ षटकांत त्यांनी ५३ धावांत ६ विकेट्स गमावल्या.
पाकिस्तानच्या १३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात शाहिन शाह आफ्रिदीला ( Shahin Afridi) दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि
बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि मोईन अली ( Moeen Ali) यांनी हात मोकळे करताना इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले. वेस्ट इंडिजनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप दुसऱ्यांदा उंचावणारा इंग्लंड दुसरा संघ ठरला. यापूर्वी त्यांनी २०१०मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंडकडून जोस बटलर ( २६), मोईन अली ( १९) व हॅरी ब्रुक ( २०) यांनी चांगला खेल केला. फिल सॉल्ट( १०), अॅलेक्स हेल्स ( १) यांनी निराश केले.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील बक्षीस रकमेचे वर्गीकरण
- विजेता संघ - १.६ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १३ कोटी
- उप विजेता - ८ मिलियन डॉलर म्हणजे ६.५२ कोटी
- उपांत्य फेरीतील पराभूत संघ - प्रत्येकी ४ मिलियन डॉलर म्हणजे ३.२६ कोटी
- सुपर १२ मध्ये प्रत्येक विजयासाठी - ४० हजार डॉलर म्हणजे ३२ लाख ( एकूण ९.७९ कोटी)
- सुपर १२ मध्ये आव्हान संपणाऱ्या ८ संघांना प्रत्येकी ७० हजार डॉलर म्हणजे ५७ लाख ( एकूण ४.५६ कोटी)
- पहिल्या फेरीत विजयी होणाऱ्या १२ संघांना प्रत्येकी ४० हजार डॉलर म्हणजे ३२ लाख ( एकूण ३.९१ कोटी)
- पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या ४ संघांना प्रत्येकी ४० हजार डॉलर म्हणजे ३२ लाख ( एकूण १.३० कोटी)
- एकूण रक्कम - ४५.६६ कोटी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup Final ENG vs PAK Prize money : Title and 13 crores gone ! Know how much prize money won by England, Pakistan & others team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.