T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : २०१५च्या वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं एकतर्फी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून न्यूझीलंडला जेतेपदापासून वंचित ठेवले. सहा वर्षांनंतर उभय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी भिडणार आहेत. पण, यावेळी निकाल वेगळा लागेल अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियानंही अगदी मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडची कामगिरी मागली दोन वर्षांत प्रचंड उंचावली आहे आणि ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्यासाठी ते सज्ज आहेत. पण, आयसीसी स्पर्धेतील इतिहात किवींच्या विरोधातील असल्यानं ऑस्ट्रेलियाचेही पारडे जड झाले आहे.
न्यूझीलंडला बाद फेरीत एकदाही ऑस्ट्रेलियावर विजय मिळवता आलेला नाही. आतापर्यंत न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम असे एकूण १७ सामने खेळले गेले आणि त्यात ऑस्ट्रेलियानं १६ विजय मिळवले आहेत. १९८१मध्ये न्यूझीलंडनं जिंकलेला एकमेव सामना हा बाद फेरीचा नव्हता, तर बेस्ट ऑफ फाईव्ह असा होता. आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियानं चारही बाद फेरीचे सामने जिंकले आहेत.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकूण १२ सामन्यांपैकी १० सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघानं विजयाची नोंद केली आहे. यातही ११ सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडचा संघ - मार्टीन गुप्तील, डॅरील मिचेल, केन विलियम्सन, टीम सेईफर्ट, ग्लेन फिलिप्स, जिमी निशॅम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, इश सोढी ( New Zealand - 1 Martin Guptill, 2 Daryll Mitchell, 3 Kane Williamson, 4 Tim Seifert (wk), 5 Glenn Phillips, 6 James Neesham, 7 Mitchell Santner, 8 Tim Southee, 9 Adam Milne, 10 Trent Boult, 11 Ish Sodhi)
ऑस्ट्रेलियाचा संघ - डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड ( Australia - 1 David Warner, 2 Aaron Finch (capt.), 3 Mitchell Marsh, 4 Steven Smith, 5 Glenn Maxwell, 6 Marcus Stoinis, 7 Matthew Wade (wk), 8 Pat Cummins, 9 Mitchell Starc, 10 Adam Zampa, 11 Josh Hazlewood)