T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया हे दोन कट्टर संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदासाठी एकमेकांना भिडणार आहेत. न्यूझीलंडला कोणत्याही स्पर्धेतील नॉक आऊट सामन्यात आतापर्यंत एकदाही ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर हा इतिहास बदलण्याचे दडपण असेल. मागील दोन वर्षांत न्यूझीलंड संघानं तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मोठी झेप घेतली आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपचं उपविजेतेपद, २०२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदानंतर आता ट्वेंट-२० वर्ल्ड कप उंचावण्यासाठी किवी सज्ज आहेत. पण, टीम इंडियाचा भुतकाळ किवींच्या जेतेपदाच्या मार्गात आडवा येण्याची आकडेवारी समोर आली आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात आनंदाचे वातावरण आहे.
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी आपापल्या गटातून दुसरे स्थान पटकावताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत बलाढ्य पाकिस्तानला, तर न्यूझीलंडनं इंग्लंडला पराभूत केले. या दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यात बरेच सामन्य पाहायला मिळाले. पहिल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडवर ५ विकेट्स व ६ चेंडू राखून विजय मिळवला, याच फरकानं ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या सेमीत पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आणले. दोन्ही संघांना अखेरच्या २ षटकांत विजयासाठी २२ धावा हव्या होत्या आणि त्यांनी १ षटक राखून ते लक्ष्य पार केले. दोन्ही संघांना अखेरच्या पाच षटकांत ६०+ धावा करायच्या होत्या आणि त्यांनी एक षटक हातचे राखून सामना जिंकला. याव्यतिरिक्त दोन्ही संघांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्रतिस्पर्धी संघाचे चार फलंदाज माघारी पाठवले. ज्या गोलंदाजानं डावाची सुरुवात केली त्याच्याच षटकानं सामन्याचा शेवट झाला.
टीम इंडिया अन् आजच्या सामन्याचं काय कनेक्शन?ग्रुप २ मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात सामना झाला होता आणि त्यात किवींनी बाजी मारली होती. पण, बाद फेरीपूर्वी टीम इंडियाविरुद्ध खेळणं केन विलियम्सनच्या संघाला जेतेपदापासून दूर ठेवणारा ठरणार आहे. Espn Cricinfoनं पोस्ट केलेल्या स्टॅट्सनुसार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बाद फेरीपूर्वी जोजो संघ टीम इंडियाविरुद्ध खेळला, तो जेतेपदापासून वंचित राहिला आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि टीम इंडियाचे साखळी फेरीतील प्रतिस्पर्धी
- २००७ - स्कॉटलंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका ( विजेता - भारत)
- २००९ - बांगलादेश, आयर्लंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका ( विजेता - पाकिस्तान)
- २०१० - अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका ( विजेता - इंग्लंड)
- २०१२ - अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका ( विजेता- वेस्ट इंडिया)
- २०१४ - पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज ( विजेता- श्रीलंका)
- २०१६ - न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया ( विजेता- वेस्ट इंडिज)