T20 World Cup, Hardik Pandya : मागचा वर्ल्ड कप विसरून भारतीय संघाने यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवताना ग्रुप २ मध्ये भारताने दोन गुणांची कमाई केली. विराट कोहली ( ८२*) व हार्दिक पांड्या ( ३ विकेट्स व ४० धावा) हे या विजयाचे खरे शिल्पकार ठरले. आता भारतीय संघ २७ ऑक्टोबरला नेदरलँड्सचा सामना करणार आहे. भारतासाठी हे फार अवघड नसले तरी प्रतिस्पर्धीला हलक्यात घेणं महागात पडू शकतं. काल भारतीय संघ सिडनीत पोहोचला आणि पहिल्या सराव सत्रात सहभाग घेतला. पण, हार्दिक, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यांनी सराव सत्रातून विश्रांती घेतली होती. त्यात हार्दिकच्या ( Hardik Pandya) तंदुरूस्तीबाबत चर्चा सुरू झाल्या आणि आज गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी महत्त्वाचे अपडेट्स दिले.
भारताच्या वाट्याला आज थोडं दुःख, थोडा आनंद आला! Group 2 Point Table मध्ये पाकिस्तानला दिलासा
पाकिस्तानविरुद्धच्या विजयात हार्दिकने खूप मोठा वाटा उचलला. त्याने एकाच षटकात दोन मोठ्या विकेट्स घेत पाकिस्तानच्या धावसंख्येला लगाम लावली. ४ षटकांत ३० धावांत ३ विकेट्स त्याने घेतल्या. त्यानंतर १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे ४ फलंदाज ३१ धावांवर माघारी परतले होते. त्यावेळी हार्दिकने संयमी खेळ करताना विराटसह ११३ धावांची भागीदारी केली. ३७ चेंडूंत २ षटकार व १ चौकारासह ४० धावा करून तो बाद झाला. डावाच्या अखेरच्या टप्प्यात त्याच्या पायात क्रँम्प आल्याचे दिसले आणि त्यामुळे त्याने सराव सत्रातून विश्रांती घेतली. नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत त्याला विश्रांती दिली जाईल, अशीही चर्चा सुरू झाली.
त्याक्षणी गोळी खाल्ली असती, पण तुला बाद होऊ दिले नसते; Hardik Pandya-विराट कोहलीची दमदार मुलाखत, Video
भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. बुधवारी म्हाम्ब्रे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी संघ व्यवस्थापन संघाची बसलेली घडी विस्कळीत करू इच्छित नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले,'' हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याला आम्ही विश्रांती देणार नाही. स्पर्धेची सुरुवात ज्याप्रकारे आम्ही केली, त्यात सातत्य राखणे गरजेचे आहे. त्यासाठी फॉर्मात असलेला खेळाडू सोबत असणे गरजेचे आहे. हार्दिकला सर्व सामने खेळायचे आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा विचारही आम्ही करत नाही. तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.''
हार्दिकचा रेकॉर्ड...
हार्दिकने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ट्वेंटी-२०त क्रिकेटमध्ये १०००+ धावा व ५०+ विकेट्स असा अष्टपैलू विक्रम नोंदवला. ट्वेंटी-२०त असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हीन ओ'ब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup, Hardik Pandya : Indian bowling coach Paras Mhambrey confirms Hardik Pandya is fit & has no thoughts of resting him against Netherlands.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.