कॅरेबियन खेळाडू मैदानातील आपल्या हटके सेलिब्रेशनमुळं चर्चेत असतात. काही खेळाडूंनी आपल्या रागाचा पारा चढल्यावर अतरंगी अंदाजात राग व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्यात आता आणखी एका कॅरेबियन खेळआडूची भर पडली आहे. क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध लढण्यासाठी फलंदाज आपल्या बॅटचा वापर अगदी तलवारीसारखा करत असतो. ही तलवार चालवताना हेल्मेट फलंदाजाचे एखाद्या ढालीप्रमाणे संरक्षण करते. 'सुरक्षा कवच' असणारी ती ढाल कॅरेबियन गड्यानं आपल्या तलवारीनं फोडण्याचा प्रकार क्रिकेटच्या मैदानात केला आहे.
अन् रागाच्या भरात पठ्ठ्यानं बॅटनं टोलवलेलं हेल्मेट पोहचलं सीमारेषेबाहेर
कोणताही फलंदाज मैदानात आल्यावर चेंडू सीमारेषेबाहेर घालवण्यासाठी प्रयत्नशील असतो. पण रागाच्या भरात कॅरेबिन फलंदाजानं चेंडू ऐवजी हेल्मेट काढूनं ते हवेत भिरकावत त्यावर ताकदीने बॅट चालवून ते सीमारेषेबाहेर टोलवल्याचा सीन पाहायला मिळाला. या सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रेथवेट याने हा प्रकार केला आहे. तो मैदानात उत्तुंग फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. पण जे पाहायला मिळालं ते कल्पनेपलिकडचं होते. कारण त्याने आउट झाल्याचा राग हेल्मेटवर काढला.
वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू एवढा का चिडला?
४ चेंडूवर चार ४ षटकार मारत वेस्ट इंडिज संघाला टी-२० चा वर्ल्ड चॅम्पियन करणाऱ्या या खेळाडू एवढा राग कशाचा आला? असा प्रश्न क्रिकेट चाहत्याला त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर पडू शकतो. जर तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला तर त्याचं उत्तरही मिळेल. त्यामागचं कारण हे की, ब्रेथवेटला चुकीच्या पद्धतीने आउट देण्यात आले होते.
नेमकं काय घडलं?
वेस्ट इंडीजचा हा स्टार खेळाडू घरच्या मैदानात सुरु असलेल्या कॅमॅन आयलँड टी१० लीगमध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकरच्या संघाकडून खेळताना दिसत आहे. एका उत्तुंग षटकाराच्या मदतीने ४ चेंडूत ७ धावांवर खेळत असलेल्या ब्रेथवेटला पाचव्या चेंडूवर विकेट किपरकरवी घेतलेल्या झेलवर पंचांनी बाद ठरवले. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नव्हता. चेंडू हा त्याच्या खांदा आणि हेल्मेटला स्पर्श झाल्यामुळे उसळला होता. नॉट आउट असताना आउट दिल्याचा राग त्याने तंबूत परतताना आपल्या हेल्मेटवर काढला.
Web Title: T20 World Cup Hero Carlos Brathwaite Angry Man Avatar Hits His Helmet For A Six Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.