ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आता २० संघ खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) तसा विचार करत आहे. भारतात यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यात १६ संघच खेळणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील संघ संख्या २०२४पासून वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या संघविभागणी चार गटांत होते, ती पुढे पाच गटांत केली जाईल. ( ICC consider expanding T20 World Cup to 20 teams)
आयसीसीनं याआधीच महिला क्रिकेट स्पर्धांमधील संघसंख्या वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आयसीसीच्या मते क्रिकेटचा जगभरात प्रचार व प्रसार करण्यासाठी हा निर्णय घेणं महत्त्वाचे आहे. ट्वेंटी-२० फॉरमॅट हा सर्वांना सहज समजला जाऊ शकतो. त्यामुळे अनेक देश क्रिकेट यात सहभागी होऊ शकतात. महिली क्रिकेटमध्ये यूगांडा हा नवा देश सहभागी झाला आहे. पण, दुसरीकडे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आयसीसीनं संघ संख्या सातत्यानं कमी केलेली दिसत आहे. २००७मध्ये १६ संघांमध्ये वन डे वर्ल्ड कप झाला होता, २०११ व २०१५ मध्ये १४, तर २०१९मध्ये १० संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाली होते.
क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाबाबतची चर्चा सुरू आहे. BCCIने यासाठी ECBच्या प्रयत्नांचे समर्थन केले आहे. रिपोर्टनुसार, नुकत्याच पार पडलेल्या CECच्या बैठकीत ECBच्या टॉम हॅरीसन यांनी क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. BCCIनेही त्याबाबतचे मत व्यक्त केलं होतं.
Web Title: T20 World Cup: ICC considering expanding T20 WC to 20 teams - Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.