BIG NEWS FOR INDIA!, असं ट्विट करत टीम इंडियाच्या खराब कामगिरीची पाकिस्तानी मंत्र्यानं उडवली खिल्ली, दिला सल्ला...

पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्याकडून हार पत्करल्यानंतर टीम इंडियाचे आव्हान संपल्यातच जमा होती. पण, अफगाणिस्तान व स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवून टीम इंडियानं नेट रन रेट प्रचंड सुधारला अन् होप्स कायम राखल्या, पण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 04:28 PM2021-11-08T16:28:09+5:302021-11-08T16:28:33+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup : If India finish the match in 3 overs against Namibia tomorrow, they can reach airport early, Pakistani Minister Ch Fawad Hussain tweet  | BIG NEWS FOR INDIA!, असं ट्विट करत टीम इंडियाच्या खराब कामगिरीची पाकिस्तानी मंत्र्यानं उडवली खिल्ली, दिला सल्ला...

BIG NEWS FOR INDIA!, असं ट्विट करत टीम इंडियाच्या खराब कामगिरीची पाकिस्तानी मंत्र्यानं उडवली खिल्ली, दिला सल्ला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरचा साखळी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.  नामिबियाविरुद्धचा हा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळायचा आहे. भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान रविवारीच संपुष्टात आले. १९९२नंतर प्रथमच आयसीसी स्पर्धेत अखेरचा साखळी सामना खेळण्यापूर्वी टीम इंडियावर गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली आहे. आता त्याची खिल्ली पाकिस्तानी मंत्री फवाद हुसैन ( Fawad Hussain) यांनी उडवली आहे.  

पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्याकडून हार पत्करल्यानंतर टीम इंडियाचे आव्हान संपल्यातच जमा होती. पण, अफगाणिस्तान व स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवून टीम इंडियानं नेट रन रेट प्रचंड सुधारला अन् होप्स कायम राखल्या. मात्र, अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या लढतीच्या निकालानं भारतीयांच्या आशा मावळल्या.  किवींनी दमदार विजय मिळवून ग्रुप २मधून पाकिस्तानसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांच्यासह सपोर्ट स्टाफचा हा टीम इंडियासोबतचा शेवटचा सामना आहे. कोहली यापुढे ट्वेंटी-२०त टीम इंडियाचा कर्णधार राहणार नाही , तर शास्त्री अँड टीमचा कार्यकाळ आज संपतोय. त्यामुळे आजचा सामना जिंकून या सर्वांना विजयी निरोप देण्याचा सहकाऱ्यांचा इरादा आहे.

न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान या लढतीवर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून होतं. अफगाणिस्तान जिंकली असती तर टीम  इंडिया आज नामिबियाला नमबून उपांत्य फेरीत पोहोचली असती. पण, न्यूझीलंडनं ८ विकेट्स राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळून टीम इंडियाला स्पर्धेबाहेर फेकलं. अफगाणिस्तानच्या ८ बाद १२४ धावांचा न्यूझीलंडनं १८.१ षटकांत यशस्वी पाठलाग केला. 

टीम इंडिया आऊट होताच...
पाकिस्तानी मंत्री फवाद हुसैन यांनी ट्विट केलं की, BIG NEWS FOR INDIA, जर भारतानं नामिबियाविरुद्धची मॅच ३ षटकांत संपवली, तर त्यांना विमानतळावर लवकर पोहोचता येईल.  


 

Web Title: T20 World Cup : If India finish the match in 3 overs against Namibia tomorrow, they can reach airport early, Pakistani Minister Ch Fawad Hussain tweet 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.