Join us  

T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : टीम इंडियाच्या गोलंदाजांची लय बिघडली; ऑसी फलंदाजांनी अखेरच्या षटकांत आतषबाजी केली

T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live :  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. डेव्हिड वॉर्नरचा अपयशाचा पाढा कायम राहिला. पण, स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा सामना केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 5:14 PM

Open in App

T20 World Cup, India vs Australia Warm-Up match Live : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. डेव्हिड वॉर्नरचा अपयशाचा पाढा कायम राहिला. पण, स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा सामना केला. आर अश्विननं सलग दोन विकेट्स घेत चांगली सुरुवात करून दिली खरी, परंतु अन्य गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आलं. स्मिथ व मार्कस स्टॉयनिस यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना टीम इंडियासमोर आव्हानात्म धावसंख्या उभारली. 

मुख्य स्पर्धेत मैदानावर उतरण्यापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया यांना आपापल्या खेळाडूंची चाचपणी करण्याची ही अखेरची संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी प्रयोग केले. भारतानं विराट कोहली, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. पण, रिषभ पंत मैदानाबाहेर महेंद्रसिंग धोनीकडून टिप्स घेताना दिसला. त्याच्याजागी विराट क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर होता. विराटनं दोन षटकंही फेकली आणि हार्दिक पांड्याच्या रुपानं अपेक्षित असलेल्या सहाव्या गोलंदाजाची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला.

ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब म्हणजे वॉर्नरचा फॉर्म. आयपीएल २०२१त त्याला सनरायझर्स हैदराबादनं याच कारणास्तव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात त्याला ० व १ धाव करता आली आहे. अॅरोन फिंच ( ८) व मिचेल मार्श  ( ०) हे अपयशी ठरले. अश्विननं सलग दोन चेंडूंत वॉर्नर व मार्श यांना बाद केले. फिंचला रवींद्र जडेजानं माघारी पाठवले. पण, आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या मॅक्सवेलनं सराव सामन्यातही झलक दाखवली. त्यानं स्मिथसह ऑसींचा डाव सावरला. राहुल चहरनं त्याला ३७ धावांवर माघारी पाठवले.

भुवनेश्वर कुमारनं आजच्या सामन्यात कामगिरीत सुधारणा दाखवली. स्मिथ व मार्कस स्टॉयनिस जोडीनं पाचव्या विकेटसाठी १०च्या सरासरीनं धावा कुटल्या. विराटनं दोन षटकांत १२ धावा दिल्या. आर अश्विननं २ षटकांत ८ धावांत २ विकेट्स, तर जडेजानं ४ षटकांत ३५ धावांत १ विकेट घेतली. स्टॉयनिस २५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४१ धावांवर नाबाद राहिला. स्मिथ ४८ चेंडूंत ७ चौकारांसह ५७ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ५ बाद १५२ धावा केल्या. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१स्टीव्हन स्मिथभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाग्लेन मॅक्सवेल
Open in App