Join us  

T20 World Cup, IND vs BAN : विराट 'गुरूजी' चमकले! KL Rahul ला केलेले मार्गदर्शन फायद्याचे ठरले, भारताने तगडे लक्ष्य उभे केले

T20 World Cup, India vs Bangladesh : रोहित शर्मा लगेच माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल व विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 3:14 PM

Open in App

T20 World Cup, India vs Bangladesh : रोहित शर्मा लगेच माघारी परतल्यानंतर लोकेश राहुलविराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना भारताला मजबूत स्थितीत आणले. विराटने आजच्या सामन्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम नावावर केला. लोकेशला त्याने केलेले मार्गदर्शन यशस्वी ठरले आणि भारताने बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य उभे केले. 

विराट कोहलीने No Ball देण्याचा इशारा केला, शाकिब फलंदाजाकडे धावत आला अन्... 

रोहित व लोकेश यांनी खणखणीत फटके मारून आशादायक चित्र दाखवले, परंतु रोहितने निराश केले. तस्कीन अहमनदने टाकलेल्या तिसऱ्या षटकात रोहित शर्मा ( Rohit Sharma)ने उत्तुंग फटका मारला, परंतु हसन महमूदने सोपा झेल टाकला. नेदरलँड्सविरुद्ध रोहितला जीवदान मिळाले होते आणि त्यानंतर त्याने अर्धशतक झळकावले होते. आजही रोहित या संधीचं सोनं करेल असे वाटले, परंतु पुढच्याच षटकात महमूदने भारताच्या कर्णधाराला चूक करण्यास भाग पाडले आणि यासीर अली करवी झेलबाद केले. लोकेश राहुल ( KL Rahul) व विराट कोहली ( Virat Kohli) याने दमदार फटकेबाजी करून भारताच्या धावांचा वेग वाढवला. लोकेशही ३२ चेंडूंत ३ चौकार व  ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला. विराटसह त्याने ६७ धावांची भागीदारी केली. 

आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमावारीत नंबर १ बनलेल्या सूर्यकुमार यादवने त्याचा तुफान फॉर्म कायम राखताना बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. विराट पुन्हा एकदा प्रेक्षकाच्या भूमिकेत जात नॉन स्ट्रायकर एंडला फटकेबाजीचा आस्वाद घेत होता. या दोघांची ३८ धावांची भागीदारी शाकिब अल हसनने तोडली. सूर्या १६ चेंडूंत ३० धावा ( ४ चौकार) करून माघारी परतला. बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांकडून आज २-३ सोपे झेल टाकले आणि त्यात सूर्याचाही झेल होता. हार्दिक पांड्या ५ धावांवर बाद झाला.  विराट व दिनेश कार्तिक यांच्याकडून अखेरच्या षटकांत मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती, परंतु दोघांमध्ये ताळमेळ चूकलेला पाहयला मिळाला.

कार्तिक ( ७) रन आऊट झाला, त्यानंतर आलेला अक्षर पटेलही (७) लगेच माघारी परतला. विराटने अखेपर्यंत फटकेबाजी करताना भारताला मोठा पल्ला गाठून दिला. अश्विन यानेही चांगली फटकेबाजी केली. विराट ४४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर नाबाद राहिला. भारताने ६ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीलोकेश राहुल
Open in App