T20 World Cup, IND vs BAN : KL Rahul ने मॅच फिरवली, डायरेक्ट हिट करून महत्त्वाची विकेट मिळवली, Video 

 T20 World Cup, India vs Bangladesh: पावसाच्या व्यत्ययानंतर सुधारित लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचे दोन्ही ओपनर झटपट माघारी परतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 05:08 PM2022-11-02T17:08:37+5:302022-11-02T17:09:29+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs BAN : Outstanding from KL Rahul as he nails a direct hit from deep midwicket, Bangladesh lose Liton Das, Watch Video  | T20 World Cup, IND vs BAN : KL Rahul ने मॅच फिरवली, डायरेक्ट हिट करून महत्त्वाची विकेट मिळवली, Video 

T20 World Cup, IND vs BAN : KL Rahul ने मॅच फिरवली, डायरेक्ट हिट करून महत्त्वाची विकेट मिळवली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 T20 World Cup, India vs Bangladesh: पावसाच्या व्यत्ययानंतर सुधारित लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचे दोन्ही ओपनर झटपट माघारी परतले. KL Rahul ने क्षेत्ररक्षणात जबरदस्त कामगिरी करताना भारतासाठी धोकादायक ठरणाऱ्या लिटन दासला रन आऊट केले आणि त्यानंतर मोहम्मद शमीनेही एक विकेट मिळवून दिली. सूर्यकुमार यादवने सुरेख झेल टिपला.  

पाऊस थांबला, १६ षटकांचा सामना होणार; बांगलादेशसमोर नवं टार्गेट, भारताचं टेंशन वाढलं

लोकेश राहुल व विराट कोहली या दोघांनी भारतीय संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आजही अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवने त्याच्या शैलीत फटकेबाजी केली, परंतु आज मोठी खेळी करण्यापासून चूकला. लोकेश ३२ चेंडूंत ३ चौकार व  ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला. विराटसह त्याने ६७ धावांची भागीदारी केली.  सूर्या १६ चेंडूंत ३० धावा ( ४ चौकार) करून माघारी परतला. विराटने अखेपर्यंत फटकेबाजी करताना भारताला मोठा पल्ला गाठून दिला. अश्विन यानेही ६ चेंडूंत १३ धावा कुटल्या. विराट ४४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर नाबाद राहिला. भारताने ६ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला. 


भारताच्या १८४ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने तुफानी खेळी केली.  बांगलादेशच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. लिटन दास व नजमूल शांतो यांनी बांगलादेशला दमदार सुरुवात करून देताना ७.१ षटकांत ६८ धावांची भागीदारी केली. पावसामुळे त्यानंतर सामना बराच काळ थांबवण्यात आला आणि बांगलादेशसमोर नवीन लक्ष्य ठेवले गेले आहे. आता १६ षटकांचा सामना खेळवण्यात येणार असून बांगलादेशला ५४ चेंडूंत ८५ धावा करायच्या होत्या. 


सुधारित लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या बांगलादेशला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. लोकेश राहुलच्या डायरेक्ट हिटने भारताला मोठी विकेट मिळवून दिली. २७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा करणारा लिटन दास रन आऊट झाला. त्यानंतर मोहम्मद शमीने टाकलेल्या १०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नजमूल शांतोने खणखणीत फटका मारला, परंतु सूर्यकुमारने सुरेख झेल टिपला. शांते २१ धावांवर बाद झाल्याने बांगलादेशची अवस्था २ बाद ८४ झाली. लोकेश राहुलने सामन्याला कलाटणी दिली. 


 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: T20 World Cup, IND vs BAN : Outstanding from KL Rahul as he nails a direct hit from deep midwicket, Bangladesh lose Liton Das, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.