भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मैदानावर जितका आक्रमक दिसतो तितकाच मैदानाबाहेर उदार मनाचाही दिसतो. नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर त्याने याचे आणखी एक उदाहरण दिले आहे. भारताविरुद्ध 60 धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या लिटन दासला सामन्यानंतर कोहलीने आपली बॅट भेट दिली आहे. या खास भेटीमुळे या 28 वर्षीय खेळाडूचे मनोबल नक्कीच वाढले असेल.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना लिटल दासने आपल्या संघाला झंझावाती सुरुवात करून दिली आणि अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावले. पाऊस येण्याआधी बांगलादेश सामन्यात टिकून होता, पण केएल राहुलने केलेल्या शानदार रनआऊटनंतर सामना भारताच्या दिशेने वळला. टीम इंडियाने हा सामना 5 धावांच्या (DLS) जिंकला.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) क्रिकेट संचालन अध्यक्ष जलाल युनूस यांनी लिटन दासला बॅट भेट दिल्याची पुष्टी केली आहे. त्सामना संपल्यानंतर कोहली ड्रेसिंग रूममध्ये आला आणि त्याने लिटन दासला ही खास भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. 'आम्ही डायनिंग हॉलमध्ये बसलो असताना विराट कोहली आला आणि त्याने लिटनला बॅट भेट दिली. लिटनसाठी ही खूप मोठी प्रेरणा आहे असे मला वाटते,’ असं जलाल युनूस यांनी म्हटल्याचं BDcrictime Bangla नं म्हटलंय.
विराटची तुफान खेळी
या सामन्यात विराट कोहलीने 64 धावांची नाबाद खेळी खेळली होती. या खेळीच्या जोरावर 2022 च्या टी 20 विश्वचषकात कोहलीच्या नावावर आता 220 धावा आहेत, तो आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये एकदा बाद झाला आहे आणि उर्वरित तीन वेळा त्याने नाबाद अर्धशतके झळकावली आहेत.
Web Title: T20 World Cup IND Vs BAN virat kohli gifts a bat to litton das after ind vs ban match in t20 wc bcb cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.