काल झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयाने भारतीय संघाचा सेमी फायनलसाठी मार्ग सोपा झाला. हा सामना काल बुधवारी एडिलेड येथे खेळवण्यात आला.बांगलादेशच्या टीमने सामन्याच्या शेवटपर्यंत विजयासाठी खेळी केली, पण अखेर टीम इंडियाने ५ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात बांगलादेशने कडवी झुंज दिली होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांचाही गोंधळ उडाला होता. पण कर्णधार रोहित शर्माच्या रणनितीमुळे पुन्हा भारतीय संघाचा विजयाचा मार्ग सोपा झाला. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि हार्दिक पांड्या या दोगांनी २-२ विकेट्स घेतल्या.
बांगलादेश संघाला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती, यावेळी रोहित शर्माने शेवटचे षटक मोहम्मद शमीला न देता तरुण गोलंदाज अर्शदीप याला दिले, या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. रोहितचा हा निर्णय यशस्वी ठरला.
या निर्णयावर रोहितने सामन्यानंतर खुलासा केला. टीम इंडियात शेवटचे निर्णायक षटक घेणारा जसप्रीत बुमराह हा संघात नसतानाही टीममध्ये अजून एक असं षटक घेणारा गोलंदाज असल्याचे शर्माच्या प्रतिक्रियेवरुन दिसते. तो गोलंदाज म्हणजे अर्शदीप सिंग आहे.
सामना ज्यावेळी सिरू असतो, त्यावेळी ताण जास्त असतो. त्यावेळी शांत राहूनच काम करणे गरजेच असते. त्यामुळे मी तेव्हा नर्व्हस असतो. कालच्या सामन्यात काहीही होऊ शकले असते. यावेळी बोलताना रोहितने विराट आणि केएल राहुलचे कौतुक केले.
बुमराला मिळाला पर्याय
आम्ही अर्शदीप सिंगला षटक दिले तेव्हा त्याला आम्ही विकेट घेण्यास सांगितले. या सामन्यात जसप्रीत बुमराह नव्हता. म्हणून आम्हीला कोणीतरी विकेट घेणारा गोलंदाज हवा होता. अर्शदीपने हे करुन दाखवले आहे, असंही रोहित म्हणाला.
काल झालेल्या सामन्यात शेवटचे षटक हे रोमहर्षक झाले. शेवटच्या षटकात बांगलादेशला जिकंण्यासाठी २० धावांची आवश्यक्ता होती. अर्शदीपच्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार लगावला त्यामुळे भारतीय संघाचे पुन्हा टेन्शन वाढले. या षटकारानंतर अर्शदीपने आपले नियंत्रण ढासळू दिले नाही. त्याने यार्कर चेंडू टाकून बांगलादेशला बॅकफुटवर आणले, आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.