रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत धडक घेतली आहे. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यात रोहितने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूंचा सामना करत 57 धावा फटकावल्या. या खेळीच्या जोरावर रोहितने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो एकाच T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. एकूण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 2021 मध्ये 303 धावा केल्या होत्या. या यादीत रोहित शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. त्याने 248 धावा केल्या आहेत. जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. बटलरने 2022 मध्ये 225 धावा केल्या होत्या. तर केन विल्यमसन २१६ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
याशिवाय, रोहितच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. तो टी-20 विश्वचषकाच्या जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा अर्धशतक फटकावणारा खेळाडूही बनला आहे. रोहितने 11 वेळा 50 अथवा त्याहून अधिक धावा बनवल्या आहेत. या यादीत कोहली दसऱ्या स्थानावर आहे. विराट ने 10 वेळा अशी कमाल केली आहे. यानंतर तिसरा क्रमांक लागतो डेव्हिड वॉर्नरचा त्याने 7 वेळा अर्धशतक ठोकले आहे. तर जोस बटलरने 5 वेळा अशी कामगिरी केली आहे.
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा केलेल्या खेळाडूसंदर्भात बोलायचे झाल्यास, आफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाज पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 8 सामन्यांत 281 धावा ठोकल्या आहेत. यानंतर, ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेडने ऑस्ट्रेलियासाठी दमदार फलंदाजी करत 7 सामन्यात 255 धावा केल्या आहेत. या यादीत रोहित तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 7 सामन्यांत 248 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवचाही टॉप 10 खेळाडूंमध्ये समावेश आहे. तो ९ व्या क्रमांकावर असून त्याने 7 सामन्यांत 196 धावा केल्या आहेत.
Web Title: t20 world cup ind vs eng A special world record of Rohit Sharma The first captain of Team India who did such an amazing performance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.