T20 World Cup, IND vs ENG : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 गटातील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला आणि ग्रुप २ मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. आता भारतासमोर तगड्या इंग्लंडचे आव्हान आहे. भारताच्या तुलनेत ग्रुप १ अधिक आव्हानात्मक होता आणि त्याचा सामना करताना इंग्लंडने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. त्यामुळे भारतासाठी ही लढत सोपी नक्कीच नसेल. मात्र, त्याचवेळी इंग्लंडला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा स्टार फलंदाज आणि आयसीसी क्रमवारीत आघाडीवर असलेला डेवीड मलान ( Dawid Malan) उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
T20 World Cup : "Suryakumar Yadav खेळला नाही, तर भारताला १४०-१५० धावा करणेही मुश्कील होईल!"
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात १० नोव्हेंबरला एडिलेड येथे उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या लढतीपूर्वी इंग्लंडला धक्का बसला आहे. स्टार फलंदाज डेवीड मलान याला श्रीलंकेविरूद्धच्या लढतीत दुखापत झाली. १५व्या षटकात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि त्यानंतर तो लगेच मैदानाबाहेर गेला. तो फलंदाजीलाही आला नाही. ''दुखापतीमुळे त्याला मैदानावर उतरता आले नाही. आशा करतो की तो बरा होईल. त्याला नेमकं काय झालंय, हे आम्हालाही अद्याप माहीत नाही,''असे आदील राशिद म्हणाला.
इंग्लंडची कामगिरी
- ५ विकेट्स राखून वि. विरुद्ध अफगाणिस्तान
- ५ धावांनी ( DLS) पराभूत वि. आयर्लंड
- सामना रद्द वि. ऑस्ट्रेलिया
- २० धावांनी वि. विरुद्ध न्यूझीलंड
- ४ विकेट्स राखन वि. विरुद्ध श्रीलंका
फिल सॉल्ट याला अद्याप संधी मिळालेली नाही आणि अॅलेक्स हेल्स व जोस बटलर हे सलामीला खेळत आहेत. इंग्लंडच्या संघासोबत ल्यूक वूड, रिचर्ड ग्लिसन व लिएम डॉसन हे राखीव खेळाडू प्रवास करत आहेत. सॉल्ट हा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ओपनिंगला खेळतो आणि अशात त्याला खेळायचे असेल तर मधल्या फळीत खेळावे लागेल. इंग्लंडने यापूर्वी रिसे टॉप्ली याला दुखापत झाल्याने टायमल मिल्सला संघात दाखल करून घेतले होते. मलानच्या गैरहजेरीत बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. श्रीलंकेविरुद्ध स्टोक्सने याच क्रमांकावर फलंदाजीला येताना मॅच विनिंग खेळी केली होती.
भारताची कामगिरी
- ४ विकेट्स राखून वि. विरुद्ध पाकिस्तान
- ५६ धावांनी वि. विरुद्ध नेदरलँड्स
- ५ विकेट्सने पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- ५ धावांनी ( DLS) वि. विरुद्ध बांगलादेश
- ७१ धावांनी वि. विरुद्ध झिम्बाब्वे
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"