Join us  

T20 World Cup, IND vs ENG : भारतीय संघ खूपच वाईट खेळला, फायनल खेळण्याची त्यांची पात्रताच नाही; Shoaib Akhtar ने जमखेवर मीठ चोळले

T20 World Cup, India vs England Semi Final Live : भारतीय संघाने आज पूर्णपणे निराश केले.  रोहित शर्मा अँड कंपनीने मोक्याच्या क्षणी मान टाकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 6:30 PM

Open in App

T20 World Cup, India vs England Semi Final Live : भारतीय संघाने आज पूर्णपणे निराश केले.  रोहित शर्मा अँड कंपनीने मोक्याच्या क्षणी मान टाकली. विराट व हार्दिक पांड्याने फटकेबाजी करून भारताची इभ्रत वाचली होती. पण गोलंदाजांनी व क्षेत्ररक्षकांची कामगिरी आज टीका करण्यासाखीच झाली. India vs Pakistan यांच्यात मेगा फायनलची अपेक्षा सर्वांना होती, परंतु भारताच्या पराभवाने ते शक्य नाही झाले. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने ( Shoaib Akhtar) भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याची संधी सोडली नाही. 

सीनियर्सनी आता निवृत्ती घ्यायला हवी का? इंग्लंडकडून पराभवानंतर राहुल द्रविडनं केलं मोठं भाष्य

विराट कोहली  ( ५०) व हार्दिक पांड्या ( ६३*) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद १६८ धावा केल्या. जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.  इंग्लंडने १६ षटकांत बिनबाद १७० धावा करून दणदणित विजय मिळवला. भारतावर १० विकेट्स राखून विजय मिलवताना बटलर व हेल्सने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. बटलरने ४९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८० व  हेल्सने ४७ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८६ केल्या. इंग्लंडच्या सालमीवीरांनी भारताला स्पर्धेबाहेर फेकले आणि १५ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अधुरे राहिले.

शोएब अख्तर म्हणाला, भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव... खूपच खराब खेळले आणि ते पराभवाचे हकदार होते. वर्ल्ड कप फायनल खेळण्याची त्यांची पात्रताच नाही. खूपच घाणेरडा खेळ केला भारताने. गोलंदाजांनी निराश केले. युजवेंद्र चहल असायला हवा होता, संघ निवडतानाच गोंधळ दिसला. आम्हाला फायनलमध्ये तुम्हाला भेटायला आवडले असते, परंतु आता ते शक्य नाही. आता असंच भेटायला या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंडशोएब अख्तर
Open in App