T20 World Cup, IND vs ENG, Explained : भारत-इंग्लंड यांच्यातली Semi Final पावसामुळे रद्द झाल्यास काय? निर्णायक ठरेल १ गुण 

T20 World Cup, IND vs ENG, Explained : एडिलेड क्रिकेट मैदानावर १० नोव्हेंबरला होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातल्या उपांत्य फेरीच्या सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 05:05 PM2022-11-08T17:05:03+5:302022-11-08T17:06:06+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs ENG, Explained : If India-England T20 World Cup semi-final gets washed out due to rain? | T20 World Cup, IND vs ENG, Explained : भारत-इंग्लंड यांच्यातली Semi Final पावसामुळे रद्द झाल्यास काय? निर्णायक ठरेल १ गुण 

T20 World Cup, IND vs ENG, Explained : भारत-इंग्लंड यांच्यातली Semi Final पावसामुळे रद्द झाल्यास काय? निर्णायक ठरेल १ गुण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, IND vs ENG, Explained : एडिलेड क्रिकेट मैदानावर १० नोव्हेंबरला होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातल्या उपांत्य फेरीच्या सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली आहेत. आतापर्यंत साखळी गटातील सामन्यांना ५ लाख ९० हजार प्रेक्षकांनी स्टेडियमवर उपस्थिती लावली, त्यापैकी भारताच्या ५ सामन्यांसाठीची उपस्थिती ही २ लाख ८२,७८० इतकी होती. त्यामुळे India vs England यांच्यातल्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पावसाने अनेक संघांचे गणित बिघडवले आहे आणि साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस नसल्याने अनेक तगड्या संघाना फटकाही बसला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात राखीव दिवस ठेवलेला आहे आणि तरीही जर IND vs ENG सामना पावसामुळे रद्द झाला, तर काय?

Rohit Sharma Injury : रोहित शर्माने थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूला झापले, बिचाऱ्याने ड्रेसिंग रुममध्ये स्वतःला कोंडून घेतले अन्...

भारताने २००७चा पहिला वहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला, पाकिस्तानने २००९ आणि इंग्लंडने २०१०मध्ये वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली. न्यूझीलंडही यंदा जेतेपदाच्या शर्यतीत आहे. भारताचा मुकाबला एडिलेडवर होणार आहे आणि येथे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. येथे आतापर्यंत झालेल्या ११ सामन्यांत एकदाही नाणेफेक जिंकलेला संघ विजय मिळवू शकलेला नाही. पण, भारतीय संघ १५ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. खेळाडूही कसून मेहनत घेताना दिसत आहेत. 


सामना पावसामुळे झालाच नाही तर?
ICC च्या नियमानुसार उपांत्य फेरी व फायनलसाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. भारत-इंग्लंड यांच्यात १० नोव्हेंबरला लढत होणार आहे आणि पावसाने तो दिवस वाया घालवला, तर शुक्रवारी ही लढत होईल. मात्र, शुक्रवारीही पावसाने सामना होऊच दिला नाही तर काय? 

आयसीसीच्या नियमानुसार आता किमान १० षटकांचा सामना होणे आवश्यक आहे, तरच DLS नियमाचा अवलंब होईल.  या दोन दिवसांत एकही चेंडू फेकला गेला नाही, तर भारत व इंग्लंड यांच्या साखळी फेरीतील गुण पाहिले जातील. भारताने ग्रुप २ मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे आणि इंग्लंडने ग्रुप १ मध्ये ७ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे साखळी फेरीतील जास्त गुण असलेला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. अशात भारताचा मार्ग मोकळा होईल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

Web Title: T20 World Cup, IND vs ENG, Explained : If India-England T20 World Cup semi-final gets washed out due to rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.