T20 World Cup, India vs England Semi Final Live : इंग्लंडच्या जोस बटलर व अॅलेक्स हेल्स यांनी एडिलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने १० विकेट्स राखून भारताचा पराभव केला. २००७नंतर भारतीय संघ यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करेल अशीच सर्वांना अपेक्षा होती, परंतु रोहित शर्मा अँड कंपनीला अपयश आले. २०१७मध्ये भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आली नव्हती. २०१३मध्ये भारताने अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. या पराभवानंतर रोहितच्या डोळ्यांत अश्रू आलेले दिसले आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला धीर दिला.
भारतीय संघ खूपच वाईट खेळला, फायनल खेळण्याची त्यांची पात्रताच नाही; Shoaib Akhtar ने जमखेवर मीठ चोळले
विराट कोहली ( ५०) व हार्दिक पांड्या ( ६३*) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद १६८ धावा केल्या. जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडने १६ षटकांत बिनबाद १७० धावा करून दणदणित विजय मिळवला. भारतावर १० विकेट्स राखून विजय मिलवताना बटलर व हेल्सने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. बटलरने ४९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८० व हेल्सने ४७ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८६ केल्या. इंग्लंडच्या सालमीवीरांनी भारताला स्पर्धेबाहेर फेकले आणि १५ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अधुरे राहिले.