T20 World Cup, IND vs ENG : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या तयारीसाठी नेट्समध्ये कसून सराव करतोय. संघासमोर इंग्लंडचे आव्हान आणि त्यामुळेच भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजीवर कसून सराव करत आहेत. पण, हा सराव सुरू असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या हातावर जोरदार चेंडू आदळला अन् फिजिओसह इतरांनी रोहितकडे धाव घेतली. थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघू याच्या धाकधुक वाढली. त्याने टाकलेल्या चेंडूवर रोहितला ही दुखापत झाली होती आणि उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी भारताला मोठा झटका बसतोय की काय अशी शंका निर्माण झाली.
सूर्यकुमार यादवने मुंबईतूनच सुरू केलेली वर्ल्ड कपची तयारी; समोर आली इंटरेस्टींग स्टोरी
वेदनेने कळवळणाऱ्या रोहितने लगेच ग्लोव्हज काढले आणि फिजिओ व डॉक्टर त्याच्या हातावर प्राथमिक उपचार करताना दिसले. संघाचे मानसोपचार तज्ज्ञ पॅडी ऑप्टन हेही रोहितच्या बाजूला दिसले. आईस पॅक ( बर्फाची पिशवी) ने रोहितने त्याच्या हाताला शेक दिला. १५-२० मिनिटे त्याने सराव सत्रातून ब्रेक घेतला. रोहितची ही दुखपात गंभीर असल्याची सर्वांना भीती वाटत असताना अर्ध्या तासाने कर्णधार पुन्हा नेट्समध्ये आला. थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूच्या जीवात जीव आला. त्याने पुन्हा रोहितला गोलंदाजी केली. सुरूवातीला काही चेंडू खेळल्यानंतर रोहितने रघूला पुन्हा थ्रो स्टीकने गोलंदाजी करण्यास सांगितले. रोहितनेही त्यावर पुल, अपर कट, स्ट्रेट ड्राईव्ह असे फटके मारले.
भारताची कामगिरी
- ४ विकेट्स राखून वि. विरुद्ध पाकिस्तान
- ५६ धावांनी वि. विरुद्ध नेदरलँड्स
- ५ विकेट्सने पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- ५ धावांनी ( DLS) वि. विरुद्ध बांगलादेश
- ७१ धावांनी वि. विरुद्ध झिम्बाब्वे
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"