T20 World Cup, IND vs ENG Semi Adelaide weather update: पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आज भारत-इंग्लंड यांच्यातल्या सामन्यातून जेतेपदाचा दुसरा दावेदार ठरणार आहे. क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा India vs Pakistan असा ड्रिम सामना पाहायचा आहे. त्यामुळेच आजच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. India vs England यांची लढत एडिलेड ओव्हलवर होणार आहे, परंतु काल येथे रात्रभर वादळी वारा अन् मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. आज हा सामना होणार की नाही याची चिंता लागली आहे.
Explained : भारत-इंग्लंड यांच्यातली Semi Final पावसामुळे रद्द झाल्यास काय? निर्णायक ठरेल १ गुण
या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना सराव सत्रात दुखापत झाली होती. ते पूर्णपणे बरे आहेत असे सांगितले गेले असले तरी त्यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नरजा आहेत. रोहितचा फॉर्म हा तसा फार बोलका राहिलेला नाही आणि काल जसा बाबर आजमने मोक्याच्या क्षणी फॉर्म मिळवला, तसाच रोहितकडून आज खेळ अपेक्षित आहे.
यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पावसाने अनेकांचे गणित बिघडवले. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांना त्याचा जबरदस्त फटका बसलेला पाहायला मिळाला. त्यात काल एडिलेड येथे रात्रभर पाऊस पडल्याने चाहते चिंतीत आहेत. पण, आताचा तेथील हवामानाचा अंदाज पाहता सध्यातरी तेथे ढगाळ वातावरण नाही. गारवा जाणवतोय. तेथील किमान तापमान १७ डिग्री सेल्सिअस आहे आणि कमाल तापमान २६ डिग्री सेल्सिअस आहे. सकाळी पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या. दुपारी पावसाचा अंदाज नाहीच आहे. ऑस्ट्रेलियातील वेळेनुसार IND vs ENG सामना सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यामुळे संध्याकाळचा हवामानाचा अंदाज पावसाची शक्यता २० टक्के असल्याचा वर्तवत आहे.
सामना पावसामुळे झालाच नाही तर?ICC च्या नियमानुसार उपांत्य फेरी व फायनलसाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. भारत-इंग्लंड यांच्यात १० नोव्हेंबरला लढत होणार आहे आणि पावसाने तो दिवस वाया घालवला, तर शुक्रवारी ही लढत होईल. मात्र, शुक्रवारीही पावसाने सामना होऊच दिला नाही तर काय?
आयसीसीच्या नियमानुसार आता किमान १० षटकांचा सामना होणे आवश्यक आहे, तरच DLS नियमाचा अवलंब होईल. या दोन दिवसांत एकही चेंडू फेकला गेला नाही, तर भारत व इंग्लंड यांच्या साखळी फेरीतील गुण पाहिले जातील. भारताने ग्रुप २ मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे आणि इंग्लंडने ग्रुप १ मध्ये ७ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे साखळी फेरीतील जास्त गुण असलेला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. अशात भारताचा मार्ग मोकळा होईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"