IND vs ENG Semi Final : भारताच्या दोन खेळाडूंना इंग्रज घाबरलेत! उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच जोस बटलरची टीम सावध

T20 World Cup, India vs England Semi Final : आज पाकिस्तान-न्यूझीलंड असा सेमी फायनलचा पहिला मुकाबला होणार आहे. त्यानंतर गुरुवारी भारत-इंग्लंड अशी लढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 11:45 AM2022-11-09T11:45:40+5:302022-11-09T11:47:51+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs ENG Semi Final : England captain Jos Buttler names two of India's biggest weapons with the ball ahead of semi-final  | IND vs ENG Semi Final : भारताच्या दोन खेळाडूंना इंग्रज घाबरलेत! उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच जोस बटलरची टीम सावध

IND vs ENG Semi Final : भारताच्या दोन खेळाडूंना इंग्रज घाबरलेत! उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच जोस बटलरची टीम सावध

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs England Semi Final : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या चार स्पर्धकांमध्ये न्यूझीलंडची कामगिरी सातत्यपूर्ण झाली आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. भारत व इंग्लंड हे चढ-उतारांचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचले आहेत, तर पाकिस्तान नेदरलँड्सचा टेकू घेऊन कसाबसा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आज पाकिस्तान-न्यूझीलंड असा सेमी फायनलचा पहिला मुकाबला होणार आहे. त्यानंतर गुरुवारी भारत-इंग्लंड अशी लढत आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर ( Jos Buttler) याने भारताच्या आव्हानाला सज्ज असल्याचे म्हटले खरे, परंतु दोन खेळाडूंची भीती वाटत असल्याचेही त्याने मान्य केले.

काल रोहित, आज विराट कोहली! हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर स्टार फलंदाज जखमी, जाणून घ्या अपडेट्स

 भारत-पाकिस्तान फायनल होऊ देणार नाही
''आम्हाला भारत-पाकिस्तान फायनल होऊ द्यायची नाही आणि त्यामुळे त्यांची पार्टी खराब करण्याचा आमचा प्रय्तन आहे. भारतीय संघ तुल्यबळ आहे. आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू उपांत्य फेरीची लढत खेळण्यासाठी उत्सुक आहे.  भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली आहे, परंतु त्यांना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,''असेही बटलर म्हणाला.  

त्याने पुढे म्हटले की,''भुवनेश्वर कुमार हा चांगला गोलंदाज आहे, परंतु मला त्याची चिंता सतावत नाही. भारतीय संघ तुल्यबळ आहे आणि संघात काही हुकूमी खेळाडू आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फिरकीपटू मधल्या षटकांत विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका निभावतात. युजवेंद्र चहल हा भारताचा विकेट टेकिंग गोलंदाज आहे. '' भुवीने या वर्ल्ड कपमध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत, परंतु त्याने कंजूस गोलंदाजी केलीय. त्याने केवळ ५.४०च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत आणि तीन निर्धाव षटकं फेकली आहेत.  दरम्यान चहलला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही आणि इंग्लंडविरुद्धही त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. 


Surykumar Yadavने मुंबईतूनच सुरू केलेली वर्ल्ड कपची तयारी; समोर आली इंटरेस्टींग स्टोरी

यावेळी बटलरने भारताचा स्टार सूर्यकुमार यादव याचे कौतुक केले आणि तो त्यांच्यासाठी खरा धोका असल्याचे मत व्यक्त केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्याने मधल्या फळीचा भार आपल्या खांद्यावर उचलला आहे आणि त्याना १९४+च्या स्ट्राईक रेटने ५ सामन्यांत २२५ धावा चोपल्या आहेत. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहली ( २४६) व मॅक्स ओ'डाऊड ( २४२) यांच्यानंतर सूर्याचाच नंबर येतो.  बटलर म्हणाला,''त्याची खेळी पाहण्यासारखी आहे. त्याच्याकडे विविध शॉट्सचा भंडार आहे आणि त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. त्याला बाद करण्यासाठी एक चेंडू पुरेसा आहे आणि तो चेंडू टाकण्याचा आमचा प्रयत्न असले.'' 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: T20 World Cup, IND vs ENG Semi Final : England captain Jos Buttler names two of India's biggest weapons with the ball ahead of semi-final 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.