T20 World Cup, IND vs ENG Semi: रिषभ पंतच्या ड्रिम ट्वेंटी-२० टीममध्ये ना विराट, ना रोहीत; इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह स्वतःला दिले महत्त्व

T20 World Cup, IND vs ENG Semi:  भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करण्यास मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:07 AM2022-11-10T11:07:26+5:302022-11-10T11:07:44+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs ENG Semi: Rishabh Pant includes two Englishmen in his dream T20I team, ignores Virat Kohli | T20 World Cup, IND vs ENG Semi: रिषभ पंतच्या ड्रिम ट्वेंटी-२० टीममध्ये ना विराट, ना रोहीत; इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह स्वतःला दिले महत्त्व

T20 World Cup, IND vs ENG Semi: रिषभ पंतच्या ड्रिम ट्वेंटी-२० टीममध्ये ना विराट, ना रोहीत; इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह स्वतःला दिले महत्त्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, IND vs ENG Semi:  भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करण्यास मैदानावर उतरणार आहे. या सामन्यात रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिक यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले जाण्याची समसमान संधी असल्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले आहेत. रिषभला या वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातच संधी मिळाली आणि त्यातही तो केवळ ३ धावा करून माघारी परतला. त्यामुळे त्याला उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात संधी द्यावी का, हा चर्चेचा मुद्दा आहे. दुसरीकडे कार्तिकनेही संधीचं सोनं केलेलं पाहायला मिळालेलं नाही. आयपीएल २०२२मधून त्याने भारतीय संघात पुनरागमन केले, परंतु वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने निराश केल्याचे दिसतंय. 

एडिलेडमध्ये काल रात्रभर पडला मुसळधार पाऊस; भारत-इंग्लंड लढतीवर संकट? वाचा हवामानाचा अंदाज 


रिषभच्या प्लेइंग इलेव्हनबाबत चर्चा सुरू असताना भारताच्या यष्टीरक्षक-फलंदाजाने त्याच्या ड्रिम ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली आणि त्यात त्याने स्वतःला संधी दिली. फेब्रुवारी २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त पदार्पण केल्यानंतर रिषभने ६३ सामने खेळले. भारतीय संघ आज इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. पंतने पाच वर्षांच्या ट्वेंटी-२० कारकीर्दित अव्वल दर्जाचा खेळ केला आणि या अनुभवाच्या जोरावर त्याने ट्वेंटी-२० संघासाठी पहिल्या पाच खेळाडूंच निवड केली. ICC सोबत बोलताना त्याने ही नावं जाहीर केली.

उपांत्य फेरीत ज्या इंग्लंडचा सामना भारताला करायचा आहे त्याच संघातील दोन खेळाडू रिषभने त्याच्या संघात निवडले आहेत. यात पहिलं नाव इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आहे आणि लिएम लिव्हिंग्सटन असा दुसरा खेळाडू आहे. रिषभ म्हणाला, माझ्या ट्वेंटी-२० प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिल्या पाच खेळाडूंमध्ये जोस बटलर हे नाव आघाडीवर असेल. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये जेव्हा तो फलंदाजीला येतो, तेव्हा तो स्टेडियमवर कोणत्याही बाजूला फटकेबाजी करू शकतो, असा भास होतो. लिव्हिंग्सटनची फलंदाजी पाहताना आनंद मिळतो. मागील दोन-तीन वर्षांत तो जो काही खेळतोय, ते आनंददायी आहे.''

रिषभने त्याच्या संघात जसप्रित बुमराह, राशिद खान असे दोन गोलंदाज निवडले आहेत. रिषभने पाचवा खेळाडू म्हणून स्वतःचीच निवड केली.'मी हा संघ निवडतोय, म्हणजे मी असायलाच हवं,''  असं तो हसत हसत म्हणाला.  तो म्हणाला, बुमराह संघात असायलाच हवा. त्याच्यासारखा जलदगती गोलंदाज असणे गरजेचे आहे. त्याच्यासोबतीला राशिद खानची फिरकी पाहायला आवडेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

Web Title: T20 World Cup, IND vs ENG Semi: Rishabh Pant includes two Englishmen in his dream T20I team, ignores Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.