Join us  

T20 World Cup, IND vs ENG Semi : इंग्लंडविरुद्धच्या IMP लढतीत भारत Playing XI मध्ये दोन बदल करणार; राहुल द्रविडचे संकेत

T20 World Cup, IND vs ENG SEMIFINAL : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 गटातील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला आणि ग्रुप २ मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 1:35 PM

Open in App

T20 World Cup, IND vs ENG SEMIFINAL : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 गटातील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला आणि ग्रुप २ मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. आता भारतासमोर तगड्या इंग्लंडचे आव्हान आहे. भारताच्या तुलनेत ग्रुप १ अधिक आव्हानात्मक होता आणि त्याचा सामना करताना इंग्लंडने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. त्यामुळे भारतासाठी ही लढत सोपी नक्कीच नसेल. त्यामुळे टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचे संकेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहेत. रिषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्या कामगिरीवर द्रविड फार खूश नसल्याचे दिसतेय आणि त्यामुले उपांत्य फेरीच्या सामन्यात दिनेश कार्तिकला संघात पुन्हा खेळवण्याचा विचार सुरू आहे. अक्षरच्या जागी युजवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

भारतासाठी Good News! इंग्लंडचा स्टार खेळाडू सेमी फायनलच्या लढतीला मुकण्याची शक्यता उपांत्य फेरीत दोन बदल अपेक्षित

 

भारतीय संघ एडिलेड येथे पोहोचला आहे आणि तेथील खेळपट्टी पाहून त्याला सूट होईल अशी प्लेइंग इलेव्हन निवडण्यावर द्रविडचा भर आहे. एडिलेडची खेळपट्टी ही संथ गतीने गोलंदाजी करणाऱ्यांसाठी पोषक आहे. अशात लेग स्पिनर युजवेंद्र चहलला संधीची शक्यता आहे. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश पुनरागमन करू शकतो. जोपर्यंत एडिलेडची खेळपट्टी पाहत नाही, तोपर्यंत प्लेइंग इलेव्हनबाबतचा अंतिम निर्णय घेणार नाही, असेही द्रविडने स्पष्ट केले.  

तो म्हणाला,''संघातील प्रत्येक १५ खेळाडूंना संधी आहे, असाच दृष्टीकोन आमचा आहे. या पंधरा खेळाडूंपैकी प्रत्येकजण संघाला बळकट करण्यास सक्षम आहे. एडिलेडची खेळपट्टी पाहिल्यानंतर प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेतला जाईल. बांगलादेशविरुद्ध इथे आम्ही खेळलो होतो, परंतु उपांत्य फेरीची खेळपट्टी ही वेगळी असेल. बांगलादेशविरुद्ध फिरकीला साथ मिळाली नव्हती.'' 

अक्षर पटेलला आतापर्यंत समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध त्याने एका षटकात २१ धावा दिल्या. झिम्बाब्वेविरुद्ध ३.२ षटकांत त्याने ४० धावा दिल्या.

भारताची कामगिरी

  • ४ विकेट्स राखून वि. विरुद्ध पाकिस्तान
  • ५६ धावांनी वि. विरुद्ध नेदरलँड्स
  • ५ विकेट्सने पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • ५ धावांनी ( DLS) वि. विरुद्ध बांगलादेश
  • ७१ धावांनी वि. विरुद्ध झिम्बाब्वे

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंडराहुल द्रविडअक्षर पटेलरिषभ पंत
Open in App