T20 World Cup, IND vs ENG SF Live : इंग्लंडचा 'जोस'पूर्ण विजय; 'हेल्स' वादळात टीम इंडियाची पार दाणादाण, दहा विकेट्सनी पराभव

T20 World Cup, India vs England Semi Final Live : जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 04:34 PM2022-11-10T16:34:52+5:302022-11-10T16:35:07+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs ENG SF Live : England beat India by 10 wickets in the Semi Final 2 at Adelaide Oval, meet pakistan in finals | T20 World Cup, IND vs ENG SF Live : इंग्लंडचा 'जोस'पूर्ण विजय; 'हेल्स' वादळात टीम इंडियाची पार दाणादाण, दहा विकेट्सनी पराभव

T20 World Cup, IND vs ENG SF Live : इंग्लंडचा 'जोस'पूर्ण विजय; 'हेल्स' वादळात टीम इंडियाची पार दाणादाण, दहा विकेट्सनी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs England Semi Final Live : जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. एडिलेडवर मोठ्या संख्येने भारतीय फॅन्स उपस्थित होते आणि हार्दिक त्यांना चिअर करण्यासाठी उत्साहित करत होता. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष दिसला. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनी त्यांना गप्प केले. इंग्लंडच्या सालमीवीरांनी भारताला स्पर्धेबाहेर फेकले आणि १५ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अधुरे राहिले. 

वर्ल्ड कप फायनल ना रविवारी, ना सोमवारी; जेतेपद विभागून दिले जाणार? ICC ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

लोकेश राहुल ( ५) , रोहित शर्मा ( २७) व सूर्यकुमार यादव ( १४) यांनी निराश केल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) इंग्लंडचा सामना केला.रोहित व विराट यांनी ४७ धावांची भागीदारी करून डाव सावरला, परंतु त्यांचा वेग संथ होता.   हार्दिकने अखेरच्या षटकात वादळ आणले आणि २९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. २०व्या षटकात रिषभने हार्दिकसाठी स्वतःची विकेट फेकली. स्वतः रन आऊट होत त्याने हार्दिकला स्ट्राईक दिली. हार्दिकने पुढील तीन चेंडूंवर ६,४ असे फटका मारले. अखेरच्या चेंडूवर तो हिट विकेट झाला. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावा करताना संघाला ५ बाद १६८ धावांपर्यंत पोहोचवले. 

जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. एडिलेडवर मोठ्या संख्येने भारतीय फॅन्स उपस्थित होते आणि हार्दिक त्यांना चिअर करण्यासाठी उत्साहित करत होता. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि स्टेडियमवर एकच  जल्लोष दिसला. पण, बटलरने खणखणीत चौकार खेचून भारतीय चाहत्यांना गप्प केले. हेल्सने २८ चेंडूंत एडिलेटवरील चौथे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत ५ षटकारांचा समावेश होता. ९व्या षटकात बटलरने स्कूप मारून हार्दिकने टाकलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला पाठवला. मोहम्मद शमीने पळत येत चौकार अडवला, पण त्यानंतर गोंधळ घातला.  त्याने चेंडू भुवनेश्वर कुमारच्या दिशेने फेकला आणि भुवीच्या डोक्यावरून तो दूर गेला. एवढ्यात बटलर व हेल्सने चार धावा पळून काढल्या. हा सर्व गोंधळ पाहून रोहित शर्मा भडकला, हार्दिकही चिडलेला दिसला. 

इथून भारताचे पुनरागमन अशक्यच होते आणि भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर पराभव स्पष्टपणे दिसू लागला होता. बटलरने षटकार मारून इंग्लंडचा विजय पक्का केला. इंग्लंडने १६ षटकांत बिनबाद १७० धावा करून दणदणित विजय मिळवला. भारतावर १० विकेट्स राखून विजय मिलवताना बटलर व हेल्सने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. बटलरने ४९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८० व  हेल्सने ४७ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८६ केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

 

Web Title: T20 World Cup, IND vs ENG SF Live : England beat India by 10 wickets in the Semi Final 2 at Adelaide Oval, meet pakistan in finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.