T20 World Cup, IND vs ENG SF Live : ९ चेंडूंत ४६ धावा! Hardik Pandya च्या वादळी खेळीचा विचित्र शेवट; रिषभने केला मोठा 'त्याग', Video 

T20 World Cup, India vs England Semi Final Live : हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) बॅट आज चांगलीच तळपली. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावा करताना संघाला ५ बाद १६८ धावांपर्यंत पोहोचवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 03:33 PM2022-11-10T15:33:44+5:302022-11-10T15:34:56+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs ENG SF Live : Hardik Pandya scored 63 runs from just 33 balls with 4 fours & 5 sixes, Rishabh Pant sacrifice his wicket for hardik, Video | T20 World Cup, IND vs ENG SF Live : ९ चेंडूंत ४६ धावा! Hardik Pandya च्या वादळी खेळीचा विचित्र शेवट; रिषभने केला मोठा 'त्याग', Video 

T20 World Cup, IND vs ENG SF Live : ९ चेंडूंत ४६ धावा! Hardik Pandya च्या वादळी खेळीचा विचित्र शेवट; रिषभने केला मोठा 'त्याग', Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs England Semi Final Live : लोकेश राहुल, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी निराश केल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) इंग्लंडचा सामना केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेले दिसले. विराटने आणखी एक अर्धशतकी खेळी केली, परंतु हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) बॅट आज चांगलीच तळपली. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावा करताना संघाला ५ बाद १६८ धावांपर्यंत पोहोचवले. हार्दिकच्या आजच्या या खेळीचा शेवट विचित्र झाला. रिषभ पंतने ( Rishabh Pant) त्याच्यासाठी स्वतःच्या विकेटची 

वर्ल्ड कप फायनल ना रविवारी, ना सोमवारी; जेतेपद विभागून दिले जाणार? ICC ने दिले महत्त्वाचे अपडेट्स


लोकेश राहुल ( ५) माघारी परतल्यानंतर रोहित व विराट यांनी ४७ धावांची भागीदारी करून डाव सावरला, परंतु त्यांचा वेग संथ होता. रोहित २७ धावांवर बाद झाला.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ११००+ धावा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन पर्वांत २५०+ धावा आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४००० धावा, हे विश्वविक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज विराट ठरला. सूर्यकुमार यादव १० चेंडूंत १४ धावा करून माघारी परतला. आदील रशीदने ४-०-२०-१ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. विराट ५० धावांवर ( ४ चौकार व १ षटकार) बाद झाला. 


हार्दिकने अखेरच्या षटकात वादळ आणले आणि २९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. २०व्या षटकात रिषभने हार्दिकसाठी स्वतःची विकेट फेकली. स्वतः रन आऊट होत त्याने हार्दिकला स्ट्राईक दिली. हार्दिकने पुढील तीन चेंडूंवर ६,४ असे फटका मारले. अखेरच्या चेंडूवर तो हिट विकेट झाला. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावा करताना संघाला ५ बाद १६८ धावांपर्यंत पोहोचवले.

पाहा रिषभचा त्याग

 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

Web Title: T20 World Cup, IND vs ENG SF Live : Hardik Pandya scored 63 runs from just 33 balls with 4 fours & 5 sixes, Rishabh Pant sacrifice his wicket for hardik, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.