T20 World Cup, IND vs ENG SF Live : KL Rahul ची चौकाराने सुरुवात, पण दुसऱ्याच षटकात इंग्लंडने केला घात; विराटही थोडक्यात वाचला, Video 

T20 World Cup, India vs England Semi Final Live : लोकेश राहुलने चौकार खेचून सुरुवात चांगली केली, परंतु दुसऱ्याच षटकात त्याची विकेट पडली. विराट कोहलीही थोडक्यात वाचला... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 01:47 PM2022-11-10T13:47:20+5:302022-11-10T13:48:15+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs ENG SF Live : KL Rahul departs for 5 in 5 balls  edges a chris woakes delivery for jos buttler to take the catch, Video  | T20 World Cup, IND vs ENG SF Live : KL Rahul ची चौकाराने सुरुवात, पण दुसऱ्याच षटकात इंग्लंडने केला घात; विराटही थोडक्यात वाचला, Video 

T20 World Cup, IND vs ENG SF Live : KL Rahul ची चौकाराने सुरुवात, पण दुसऱ्याच षटकात इंग्लंडने केला घात; विराटही थोडक्यात वाचला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs England Semi Final Live : लोकेश राहुलने चौकार खेचून सुरुवात चांगली केली, परंतु दुसऱ्याच षटकात त्याची विकेट पडली. विराट कोहलीही थोडक्यात वाचला... 

 वर्ल्ड कप फायनल ना रविवारी, ना सोमवारी होणार; जेतेपद विभागून दिले जाणार? ICC ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आज भारत-इंग्लंड यांच्यातल्या सामन्यातून जेतेपदाचा दुसरा दावेदार ठरणार आहे. क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा India vs Pakistan असा ड्रिम सामना पाहायचा आहे. त्यामुळेच आजच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. India vs England यांची लढत एडिलेड ओव्हलवर होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड मलान व मार्क वूड हे मुख्य खेळाडू इंग्लंडच्या संघात आज खेळणार नाहीत. ख्रिस जॉर्ड व फिल सॉल्ट यांना संधी मिळाली आहे. इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन भारताच्या हातात आयतं कोलीत दिलं. रिषभ पंतला संघात कायम राखताना भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही

एडिलेड येथे आतापर्यंत झालेल्या ११ ट्वेंटी-२० सामन्यांत नाणेफेक जिंकलेल्या संघाला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आजचा नाणेफेकीचा कौल हा भारतासाठी  शूभसंकेत आहे असे म्हणायला हवं. लोकेश राहुलने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून चाहत्यांना खूश केले. इंग्लंडने आज बेन स्टोक्सकडून पहिली ओव्हर करून घेत आश्चर्याचा धक्का दिला. मार्क वूडच्या माघारीमुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. लोकेशने ज्या प्रकारे सुरुवात केली, त्यात त्याला सातत्य राखता आले नाही. ख्रिस वोक्सने दुसऱ्या षटकात लोकेशला ( ५) बाद केले. उसळी घेणारा बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर लोकेशने फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु यष्टीरक्षकाने सोपा झेल घेतला. 


सॅम कुरनने टाकलेल्या तिसऱ्या षटकात विराट कोहलीच्या बॅटीला लागून चेंडू पहिल्या स्लीपच्या दिशेने गेला, परंतु मोईन अली झेल घेण्याआधी चेंडू पुढे पडला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

Web Title: T20 World Cup, IND vs ENG SF Live : KL Rahul departs for 5 in 5 balls  edges a chris woakes delivery for jos buttler to take the catch, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.