Join us  

T20 World Cup, IND vs ENG SF Live : रोहित शर्माचा पारा चढला, मोहम्मद शमीने घातलेला गोंधळ पाहून हार्दिकही चिडला 

T20 World Cup, India vs England Semi Final Live : जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 4:10 PM

Open in App

T20 World Cup, India vs England Semi Final Live : जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. एडिलेडवर मोठ्या संख्येने भारतीय फॅन्स उपस्थित होते आणि हार्दिक त्यांना चिअर करण्यासाठी उत्साहित करत होता. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि स्टेडियमवर एकच  जल्लोष दिसला. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनी त्यांना गप्प केले. त्यात भारतीय क्षेत्ररक्षणात गोंधळ घालताना दिसले आणि कर्णधार रोहित शर्माला राग अनावर झाला.

९ चेंडूंत ४६ धावा! हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीचा विचित्र शेवट; रिषभने केला मोठा 'त्याग', Video

लोकेश राहुल ( ५) , रोहित शर्मा ( २७) व सूर्यकुमार यादव ( १४) यांनी निराश केल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) इंग्लंडचा सामना केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेले दिसले. विराटने आणखी एक अर्धशतकी खेळी केली, परंतु हार्दिक  पांड्याची ( Hardik Pandya) बॅट आज चांगलीच तळपली. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावा करताना संघाला ५ बाद १६८ धावांपर्यंत पोहोचवले. 

रोहित व विराट यांनी ४७ धावांची भागीदारी करून डाव सावरला, परंतु त्यांचा वेग संथ होता. रोहित २७ धावांवर बाद झाला.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ११००+ धावा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन पर्वांत २५०+ धावा आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४००० धावा, हे विश्वविक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज विराट ठरला. हार्दिकने अखेरच्या षटकात वादळ आणले आणि २९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. २०व्या षटकात रिषभने हार्दिकसाठी स्वतःची विकेट फेकली. स्वतः रन आऊट होत त्याने हार्दिकला स्ट्राईक दिली. हार्दिकने पुढील तीन चेंडूंवर ६,४ असे फटका मारले. अखेरच्या चेंडूवर तो हिट विकेट झाला.  

जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. एडिलेडवर मोठ्या संख्येने भारतीय फॅन्स उपस्थित होते आणि हार्दिक त्यांना चिअर करण्यासाठी उत्साहित करत होता. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि स्टेडियमवर एकच  जल्लोष दिसला. पण, बटलरने खणखणीत चौकार खेचून भारतीय चाहत्यांना गप्प केले. इंग्लंडने पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ६३ धावा केल्या. सातव्या षटकात आर अश्विनने फिरकीची कमाल दाखवताना इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण, हेल्सने गुडघ्यावर बसून स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार खेचला.

हेल्सने २८ चेंडूंत एडिलेटवरील चौथे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत ५ षटकारांचा समावेश होता. ९व्या षटकात बटलरने स्कूप मारून हार्दिकने टाकलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला पाठवला. मोहम्मद शमीने पळत येत चौकार अडवला, पण त्यानंतर गोंधळ घातला.  त्याने चेंडू भुवनेश्वर कुमारच्या दिशेने फेकला आणि भुवीच्या डोक्यावरून तो दूर गेला. एवढ्यात बटलर व हेल्सने चार धावा पळून काढल्या. हा सर्व गोंधळ पाहून रोहित शर्मा भडकला, हार्दिकही चिडलेला दिसला. इंग्लंडनं १० षटकांत ९८ धावा केल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माहार्दिक पांड्यामोहम्मद शामी
Open in App