Join us  

T20 World Cup, IND vs NED : इंग्लंड, न्यूझीलंडसोबत जे झालं तेच भारताविरुद्ध होणार; नेदरलँड्स उद्या इतिहास रचणार, मोठी अपडेट्स 

T20 World Cup, IND vs NED : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आजचा दिवस इंग्लंडच्या कायम लक्षात ठेवेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 5:24 PM

Open in App

T20 World Cup, IND vs NED : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आजचा दिवस इंग्लंडच्या कायम लक्षात ठेवेल. आयर्लंडने त्यांना DLS डकवर्थ लुईस प्रणालीनुसार ५ धावांनी पराभूत केले आणि स्पर्धेतील पुढील वाटचाल खडतर बनवली. पावसामुळेच मेलबर्नवरील आजचा दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान रद्द करावा लागला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुणावर समाधान मानावे लागले. अफगाणिस्तान व आयर्लंड यांच्यासाठी पाऊस वरदान घेऊन आला. अशीच कृपा नेदरलँडवर उद्या होण्याची शक्यता आहे. सिडनी येथील हवामान खात्यानुसार उद्याचा दिवस पाऊस पडण्याची शक्यता ८० टक्के आहे आणि त्यामुळे भारताला हातच्या दोन गुणांवर पाणी सोडावे लागणार आहे.

भारताच्या वाट्याला आज थोडं दुःख, थोडा आनंद आला! Group 2 Point Table मध्ये पाकिस्तानला दिलासा 

भारताने पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. ग्रुप २ मध्ये बांगलादेशनेही विजयाची नोंद करून सरस नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना पावसामुळेच अनिर्णित राहिला आणि दोघांना एकेक गुण मिळाले. आफ्रिकेच्या या निकालामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. आता भारत-नेदरलँड्स मॅच पावसामुळे रद्द होणार असे संकेत मिळाल्याने पाकिस्तानच्या ताफ्यातील आनंद द्विगुणित झाला असेल.

अफगाणिस्तानचे नशीब चमकले, न्यूझीलंडविरुद्ध गुण कमावला; Group 1 मध्ये आतापासूनच चुरस सुरू झाली

भारत-नेदरलँड्स यांच्यात २७ ऑक्टोबरला सामना होणार आहे आणि तेव्हा २४ डिग्री सेल्सिअस तापमान असण्याचा अंदाज आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता हा सामना होणार आहे आणि त्या दरम्यान सिडनीत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास नेदरलँड्स व भारत यांना एकेका गुणावर समाधान मानावे लागेल आणि ग्रुप २ मधील शर्यत अधिक चुरशीची होईल.

  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारतभारतीय क्रिकेट संघ
Open in App