T20 World Cup, IND vs NZ, Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं टीम इंडियामधील स्थान हे मेंटॉर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्यामुळे कायम राहिलंय, हे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएल २०२१मध्ये हार्दिक गोलंदाजी करण्यात अपयशी ठरल्यानंतर बीसीसीआय त्याला मायदेशात पाठवणार होते, पण, धोनीनं त्यांना ग्वाही दिली अन् हार्दिक संघात कायम राहिला. आता धोनी त्याचा शब्द खाली पडू नये यासाठी हार्दिकसोबत नेट्समध्ये वेळ घालवत आहे. बीसीसीआयनं हार्दिकला माघारी पाठवले असते तर त्याचा परिणाम अष्टपैलू खेळाडूच्या कारकिर्दीवर झाला असता. त्यामुळे धोनी तिच्या पाठीशी उभा आहे. आता टीम इंडियाच्या सराव सत्रातही तो हार्दिकला टीप्स देताना दिसत आहे.
हार्दिक, अश्विनच्या जागी या दोन खेळाडूंना संधी द्या - मोहम्मद अझरुद्दीन"येत्या रविवारी भारताला आपला महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. त्यामुळे भारतानं आपल्या बेस्ट टीमसह उतरलं पाहिजे. टीमला मजबूत करण्यासाठी अखेरच्या क्षणी त्यात बदल करण्यात काहीही चुकीचं नाही. भारताला पूर्णपणे तयारीसह या सामन्यात उतरायची गरज आहे. हार्दिक पांड्या अनफिट आहे, तर त्याच्या जागी इशान किशन (Ishan kishan) याला टीममध्ये सहभागी केलं जावं आणि वरूण चक्रवर्तीच्या जागी संघाच आर. अश्विनला संधी मिळालया हवी," असं अझरुद्दीनं सांगितलं.