T20 World Cup, IND vs NZ : भारताला चूका सुधारण्याची संधीच मिळाली नाही; आता पाकिस्तानविरुद्ध लागणार कसोटी

T20 World Cup, IND vs NZ  Warm Up Match : ऑस्ट्रेलियावरील रोमहर्षक विजयानंतर भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचा सराव सामन्यात मुकाबला करणार होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 02:10 PM2022-10-19T14:10:32+5:302022-10-19T14:10:51+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs NZ :  India vs New Zealand warm-up match called off due to persistent rains, India will face Pakistan on 23rd October  | T20 World Cup, IND vs NZ : भारताला चूका सुधारण्याची संधीच मिळाली नाही; आता पाकिस्तानविरुद्ध लागणार कसोटी

T20 World Cup, IND vs NZ : भारताला चूका सुधारण्याची संधीच मिळाली नाही; आता पाकिस्तानविरुद्ध लागणार कसोटी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, IND vs NZ  Warm Up Match : ऑस्ट्रेलियावरील रोमहर्षक विजयानंतर भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचा सराव सामन्यात मुकाबला करणार होता. डेथ ओव्हरमधील चुका सुधारण्यासाठी संधी आजच्या सामन्यात भारताकडे होती, परंतु पावसाने खोडा घातला. भारत-न्यूझीलंड हा सराव सामना रद्द करावा लागला. आता भारतीय संघ थेट २३ ऑक्टोबरला पाकिस्तानचा सामना करणार आहे आणि त्यात डेथ ओव्हरमधील चूका कायम राहिल्यास रोहित अँड कंपनीला महागात पडू शकते.
 


पहिल्या सराव सामन्यात लोकेश राहुल ( ५७ ) आणि सूर्यकुमार यादव ( ५०) यांच्या अर्धशतकांनी भारताला ७ बाद १८६ धावांपर्यंत पोहोचवले. रोहित शर्मा ( १५), विराट कोहली ( १९), हार्दिक पांड्या (२) व दिनेश कार्तिक (२०) अपयशी ठरले.  ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. मिचेल मार्श ( ३५) व अ‍ॅरोन फिंच यांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा चोपल्या. स्टीव्हन स्मिथ ( ११) , ग्लेन मॅक्सवेल ( २३), मार्कस स्टॉयनिस ( ७) हे झटपट बाद झाले. १२ चेंडूंत विजयासाठी १६ धावा हव्या असताना हर्षल पटेल व मोहम्मद शमीन यांनी  सहा विकेट्स घेतल्या आणि केवळ ९ झावा दिल्या. शमीने चार चेंडूंत सलग चार ( एक रन आऊट) धक्के देताना संघाची हॅटट्रिक पूर्ण केली आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८० धावांत माघारी पाठवला.  

दरम्यान इथे झालेल्या आजच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानन ६ बाद १५३ धावा केल्या. इब्राहिम झाद्रानने ३५, तर मोहम्मद नबीने ३७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ५१ धावा केल्या. उस्मान घानीने २० चेंडूंत नाबाद ३२ धावा करून नबीसोबत अर्धशतकी भागीदारी केली. आफ्रिदीने दोन, हॅरिस रौफने दोन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानविरुद्धची ही लढत पावसामुळे रद्द करावी लागली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: T20 World Cup, IND vs NZ :  India vs New Zealand warm-up match called off due to persistent rains, India will face Pakistan on 23rd October 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.