T20 World Cup, IND vs NZ Warm Up Match : ऑस्ट्रेलियावरील रोमहर्षक विजयानंतर भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचा सराव सामन्यात मुकाबला करणार आहे. २३ ऑक्टोबरला मुख्य स्पर्धेत पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी भारताला तयारी करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. पण, हा सामना रद्द होण्याच्या मार्गावर आहे. बीसीसीआयने महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. ब्रिस्बन येथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे भारत- न्यूझीलंड सामन्याला सुरूवात होण्यास विलंब होणार आहे. भारतीय वेळेनुसार ही लढत १.३० वाजता सुरू होणार होती, परंतु सद्य परिस्थिती पाहता सायंकाळी ४.१६ चा कट ऑफ टाईम ठेवला गेला आहे. त्यानंतर ५-५ षटकांचा सामना होईल.
पहिल्या सराव सामन्यात मोहम्मद शमी स्टार ठरला....
लोकेश राहुल ( ५७ ) आणि सूर्यकुमार यादव ( ५०) यांच्या अर्धशतकांनी भारताला ७ बाद १८६ धावांपर्यंत पोहोचवले. रोहित शर्मा ( १५), विराट कोहली ( १९), हार्दिक पांड्या (२) व दिनेश कार्तिक (२०) अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. मिचेल मार्श ( ३५) व अॅरोन फिंच यांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा चोपल्या. स्टीव्हन स्मिथ ( ११) , ग्लेन मॅक्सवेल ( २३), मार्कस स्टॉयनिस ( ७) हे झटपट बाद झाले. १२ चेंडूंत विजयासाठी १६ धावा हव्या असताना हर्षल पटेल व मोहम्मद शमीन यांनी सहा विकेट्स घेतल्या आणि केवळ ९ झावा दिल्या. शमीने चार चेंडूंत सलग चार ( एक रन आऊट) धक्के देताना संघाची हॅटट्रिक पूर्ण केली आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८० धावांत माघारी पाठवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"