T20 World Cup, IND vs NZ Live Update : शार्दुल ठाकूरची होऊ शकते टीममध्ये एन्ट्री; न्यूझीलंडविरोधात अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग XI

T20 World Cup, India vs New Zealand Live Update : दोन्ही संघांसाठी आहे महत्त्वाचा सामना. विजयासाठी दोन्ही संघ जीव ओतून खेळणार.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 09:13 AM2021-10-31T09:13:32+5:302021-10-31T09:14:03+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs NZ Live Update: Who will replace Shardul Thakur in the team? This could be Team India's playing XI against New Zealand | T20 World Cup, IND vs NZ Live Update : शार्दुल ठाकूरची होऊ शकते टीममध्ये एन्ट्री; न्यूझीलंडविरोधात अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग XI

T20 World Cup, IND vs NZ Live Update : शार्दुल ठाकूरची होऊ शकते टीममध्ये एन्ट्री; न्यूझीलंडविरोधात अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग XI

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs New Zealand Live Update : पाकिस्तानकडून (India Vs. Pakistan) पराभवाचा मार खाणारे दोन संघ भारत आणि न्यूझीलंड (New Zealand) रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी जीव ओतून खेळतील यात शंका नाही आणि क्रिकेट चाहत्यांना आणखी एक संडे ब्लॉकबस्टर पाहायला मिळेल. पण, हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यातील पराभूत संघाला जर तर च्या शक्यतेवर पुढील प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान, सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवीत ठेवायच्या असतील भारतीय संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. दरम्यान, या सामन्यात शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याला संघात जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli) हा पुन्हा एकदा हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) भरवसा ठेवण्याच्या मूडमध्ये आहे. 

पाकिस्तानविरोधातीन सामन्यात सलामीवीरांना उत्तम कामगिरी करता आली नव्हती. परंतु यावेळीही रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) याच जोडीसह टीम इंडिया मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरोधातील सामन्यात अपयश आलं असलं तरी राहुलचा फॉर्मही उत्तम आहे आणि हिटमॅन एकटाम सामन्याची दिशाही पलटू शकतो, याच्याशी विराट परिचित आहे. सूर्यकुमार यादव यालाही आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनीच उत्तम खेळ खेळला होता.

हार्दिकला मिळणार संधी?
खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या हार्दिक पांड्यावर पुन्हा एकदा टीम इंडिया विश्वास करण्याची शक्यता आहे. प्रॅक्टिस सेशनमध्ये हार्दिक पांड्यानं गोलंदाजीही केली आणि न्यूझीलंडविरोधात हार्दिक गोलदाजीही करताना दिसू शकतो. हार्दिक पांड्याला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झाल्याची माहितीही कोहलीनं यापूर्वी दिली होती. पाकिस्तान विरोधातील सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर हार्दिकच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

भूवनेश्वरच्या जागी शार्दुल?
भूवनेश्वर कुमारला पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. शार्दुलचा सध्याचा फॉर्मही उत्तम आहे आणि त्यानं आयपीएल सामन्यांमध्येही उत्तम कामगिरी केली होती. शार्दुलचा टीममध्ये समावेश झाल्यास टीम इंडियाची फलंदाजीही थोडी मजबूत होऊ शकते. तर दुसरीकडे मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती आणि रविचंद्रन अश्विन यांच्यावर पुन्हा एकदा टीम इंडिया भरवसा दाखवण्याची शक्यता आहे.

असा असू शकतो संभाव्य संघ
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती/ रविचंद्रन अश्विन 

Web Title: T20 World Cup, IND vs NZ Live Update: Who will replace Shardul Thakur in the team? This could be Team India's playing XI against New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.