टीम इंडियाला येत्या रविवारी (३१ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषकाचा दुसरा सामना खेळायचा आहे, न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणारा हा सामना दोन्ही संघांसाठी बाद फेरीपेक्षा कमी नाही. या सामन्यासाठी सर्व दिग्गज क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञ टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल आपले मत मांडत आहेत. याबाबत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननंदेखील (Mohammad Azaharuddin) आपलं मत व्यक्त केलं आहे. अझरने पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन पूर्णपणे भिन्न बदल सांगितले आहेत. जर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पूर्णपणे फीट नसेल तर त्यांना बाहेर बसवलं पाहिजे. तसंच त्यानं वरूण चक्रवर्ती (Varun Chakraborty) यालाही प्लेईंग इलेव्हनच्या बाहेर ठेवण्यास त्यानं सूचवलं आहे.
"येत्या रविवारी भारताला आपला महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. त्यामुळे भारतानं आपल्या बेस्ट टीमसह उतरलं पाहिजे. टीमला मजबूत करण्यासाठी अखेरच्या क्षणी त्यात बदल करण्यात काहीही चुकीचं नाही. भारताला पूर्णपणे तयारीसह या सामन्यात उतरायची गरज आहे. हार्दिक पांड्या अनफिट आहे, तर त्याच्या जागी इशान किशन (Ishan kishan) याला टीममध्ये सहभागी केलं जावं आणि वरूण चक्रवर्तीच्या जागी संघाच आर. अश्विनला संधी मिळालया हवी," असं अझरुद्दीनं सांगितलं.वरूण चक्रवर्तीनं पाकिस्तानविरोधातील सामन्यात ४ षटकांमध्ये ३३ धावा दिल्या होत्या. तसंच इंडियान प्रीमिअर लीगमधील (IPL) त्याच्या उत्तम कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात आलं होतं. तर दुसरीकडे अश्विन २०१७ नंतर कोणताही T20 चा आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आयपीएलदरम्यानही त्याची कामगिरी तितकी चांगली नव्हती.