Join us  

T20 World Cup : India vs Pakistan सामन्यानंतर Sania Mirza ने पोस्ट केला Video, पाकिस्तानी चाहत्यांना झाला राग अनावर अन्... 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धींवर रोमहर्षक विजय मिळवून दिवाळी गोड केली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 5:14 PM

Open in App

T20 World Cup 2022 : ऐकवेळ टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला नाही तरी खपवून घेऊ, पण पाकिस्तानविरुद्ध हरता कामा नये, ही भारतीय क्रिकेट चाहत्यांची भावना आजही कायम आहे. मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाकडून ही मालिका खंडित झाली. बाबर आजम अँड टीमने बाजी मारली. पण, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धींवर रोमहर्षक विजय मिळवून दिवाळी गोड केली. आता India vs Pakistan यांच्यातला सामना म्हटला की सानिया मिर्झा व शोएब मलिक यांची चर्चा होतेच. भारताची टेनिस स्टार Sania Mirza हिला तू कोणाला चिअर करतेस, हा सवाल केला जातो आणि तिचं उत्तर भारत हेच असते. मेलबर्नवरील सामन्यानंतर सानियाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला अन् पाकिस्तानी चाहते खवळले... 

भारतीय संघ सिडनीत सरावाला लागला, पण सूर्यकुमार, हार्दिक व शमी यांनी आराम केला

शान मसूद ( ५२*) व इफ्तिखार अहमद  ( ५१) यांच्या खेळीने पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंग ( ३-३२) व हार्दिक पांड्या ( ३-३०) यांनी पाकिस्तानला धक्के दिले. हार्दिकने एका षटकात दोन विकेट्स घेत खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी दिली. प्रत्युत्तरात लोकेश राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल हे ३१ धावांवर माघारी परतले. हार्दिक ( ४०) व  विराट कोहली ( ८२*) यांनी  ११३  भागीदारी करून डाव सावरला अन् भारताने ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला. 

सानियाने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तिची आई, बहिण आणि कुटुंबातील इतर सदस्य दिसत आहेत. यात पाकिस्तानच्या विकेटमागे हे कुटुंबिय जल्लोष करताना दिसत आहे आणि भारताच्या विजयानंतर या सर्वांनी भारी जल्लोष केला. पण, सानियाच्या या पोस्टवर काहींनी नकारात्मक टीकाही केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानसानिया मिर्झा
Open in App