Join us  

IND vs PAK : "पाकिस्तानला शत्रूची गरज नाही कारण ते...", वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया

T20 World Cup 2024 IND vs PAK Match : टीम इंडियाने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 4:40 PM

Open in App

Wasim Akram on Pakistan T20 World cup : ट्वेंटी-२० विश्वचषकात पुन्हा एकदा पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाने सहा धावांनी बाजी मारली. भारताकडून जसप्रीत बुमराहने अप्रतिम कामगिरी करताना तीन बळी घेतले. भारतीय संघाने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवल्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने संताप व्यक्त केला. त्याने पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनासह खेळाडूंवर बोचरी टीका केली. 

'स्टार स्पोर्ट्स'वर सामन्याचे विश्लेषण करताना वसीम अक्रमने आपल्या संघाला घरचा आहेर दिला. तो म्हणाला की, पाकिस्तानच्या संघातील खेळाडू मागील १० वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे मी त्यांना शिकवू शकत नाही. मोहम्मद रिझवानला खेळाबद्दल काहीच माहिती नाही का? त्याला समजायला हवे होते की, जसप्रीत बुमराहला बळी घेण्यासाठीच गोलंदाजीला आणले होते. तेव्हा त्याने सावध राहायला हवे होते. पण, मोठा फटका मारण्याच्या नादात रिझवान तंबूत परतला. इफ्तिखार अहमदने देखील हेच केले. 

वसीम अक्रमचा संताप तसेच हे असे खेळाडू आहेत जे एकमेकांसोबत जास्त चर्चा करत नाहीत. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे आणि तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात. या खेळाडूंना घरी बसवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना शत्रूची गरज भासत नाही. कारण की ते स्वत:च त्यांचे शत्रू आहेत. भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानी फलंदाजांकडे खूप वेळ होता पण त्यांना ते जमले नाही. जेव्हा तुम्ही १२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असता तेव्हा स्ट्राईक रोटेट करण्याची गरज असते. अशावेळी खराब चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण, पाकिस्तानी संघाकडे कोणती रणनीतीच नसल्याने पराभव स्वीकारावा लागला, असेही वसीम अक्रमने सांगितले.

भारतीय संघाचा विजयरथपाकिस्तानचा पराभव करताच भारताने या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. तर पाकिस्तानला या पराभवासह सलग दुसऱ्यांदा हार पत्करावी लागली. त्यांना सलामीच्या सामन्यात यजमान अमेरिकेने पराभवाची धूळ चारली होती. भारतीय संघाने आयर्लंडला नमवून विजयी सलामी दिली. त्यामुळे पाकिस्तानला सुपर ८ मध्ये पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. किंबहुना शेजाऱ्यांना इतरही संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानवसीम अक्रमट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024