T20 World Cup, IND vs SA Live : Come On India! पाकिस्तानी करतायेत चिअर; भारताने जिंकली नाणेफेक, संघात केला एक बदल

T20 World Cup, India vs South Africa Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मेगा ब्लॉकबस्टर सामना पर्थवर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 04:06 PM2022-10-30T16:06:11+5:302022-10-30T16:07:06+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs SA Live : Come On India! Pakistani cheers; India have won the toss and they've decided to bat first, Axar Patel out, Deepak Hooda replaces Axar Patel in playing XI | T20 World Cup, IND vs SA Live : Come On India! पाकिस्तानी करतायेत चिअर; भारताने जिंकली नाणेफेक, संघात केला एक बदल

T20 World Cup, IND vs SA Live : Come On India! पाकिस्तानी करतायेत चिअर; भारताने जिंकली नाणेफेक, संघात केला एक बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs South Africa Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मेगा ब्लॉकबस्टर सामना पर्थवर रंगणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सामना उभय संघांसह पाकिस्तानसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज पाकिस्तानचे चाहते टीम इंडियाला चिअर करताना दिसले, तर आश्चर्य व्यक्त करायला नको. ग्रुप २ मध्ये भारताने दोन सामने जिंकून ४ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. आफ्रिकेला २ सामन्यांत १ विजय व १ अनिर्णित निकालामुळे ३ गुणच मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आजची लढत महत्त्वाची आहेच. 

बांगलादेशचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये गेले, अम्पायरने No Ball देत सर्वांना बोलावले; वाचा काय घडले


वर्ल्ड कप स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी भारताने घरच्या मैदानावर झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेत आफ्रिकेवर विजय मिळवला  होता. तिसऱ्या सामन्यात रिली रोसोवूने  नाबाद १०० धावा केल्या होत्या आणि रोसोवूने ट्वेंटी-२०तही बांगलादेशविरुद्ध  शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला. त्याशिवाय आफ्रिकेची गोलंदाजीची भन्नाट झालेली आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयी मालिका कायम राखण्यासाठी आज खूप मेहनत घ्यावी लागेल हे निश्चित आहे.

विराट कोहलीचा फॉर्म हा भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरतोय. पाकिस्तान, नेदरलँड्सविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केलीय. रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनीही त्या सामन्यात अर्धशतक झळकावले. रोहितचा  फॉर्म परतणे ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या सामन्यात विराटला एक मोठा विश्वविक्रम नोंदवण्याची संधी आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याला अव्वल बनण्यासाठी २८ धावांची गरज आहे.

माहेला जयवर्धने ( श्रीलंका) - ३१ सामने, १०१६ धावा  
विराट कोहली ( भारत) - २३ सामने, ९८९ धावा
ख्रिस गेल ( वेस्ट इंडिज)-  ३३ सामने, ९६५ धावा
रोहित शर्मा ( भारत)  - ३५ सामने, ९०४ धावा
तिलकरत्ने दिलशान ( श्रीलंका) - ३५ सामने, ८९७ धावा  

आजच्या सामन्यात लोकेश राहुलच्या जागी रिषभ पंतला खेळवण्याची चर्चा होती, परंतु गोलंदाजी प्रशिक्षकांनी ती फेटाळून लावलेली. तरीही रिषभ व दीपक हुडा बराच वेळ नेट्समध्ये सराव करताना दिसल्याने आज प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाची निवड केली गेली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

भारतीय संघ - लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीनेश कार्तिक, दीपक हुडा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग ( India XI: KL Rahul, Rohit Sharma (c), Virat Kohli, Suryakumar Yadav, Hardik Pandya, Dinesh Karthik (w), Deepak Hooda, Ravichandran Ashwin, Bhuvneshwar Kumar, Mohammed Shami, Arshdeep Singh)

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: T20 World Cup, IND vs SA Live : Come On India! Pakistani cheers; India have won the toss and they've decided to bat first, Axar Patel out, Deepak Hooda replaces Axar Patel in playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.