T20 World Cup, India vs South Africa Live Updates : भारतीय संघाला आज लुंगी एनगिडीने हैराण केले असले तर भारताकडूनही पलटवार झाला. अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) दुसऱ्या षटकात ३ चेंडूंत दोन तगडे फलंदाज माघारी पाठवले. आफ्रिकेला ३ धावांवर दोन धक्के बसले. पण, एडन मार्कराम व डेव्हिड मिलर यांनी डाव सावरला. या दोघांना बाद करण्याची संधी चालून आली होती. पण, भारताच्या ताफ्यात गोंधळ दिसला. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यामुळे हातची संधी गेली.
लोकेश राहुल ( ९) , रोहित शर्मा ( १५), विराट कोहली ( १२) , दीपक हुडा ( ०) व हार्दिक पांड्या ( २) हे ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला. लुंगी एनगिडीने ४ महत्त्वाचे फलंदाज बाद करून भारताला मोठे धक्के दिले. पण, सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याही परिस्थितीत दडपणात आला नाही आणि तणाव न घेता त्याने वादळी खेळी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताला सन्मानजक धावसंख्या उभारता आली. एनगिडीने ४-०-२९-४ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. सूर्यकुमारच्या ६८ ( ४०) धावा, अन्य फलंदाजांनी मिळून ५७ (८०) धावा केल्या. सूर्यकुमार व दिनेश कार्तिक यांनी ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार ४० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ६८ धावांवर माघारी परतला आणि भारताला ९ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.
त्यानंतर प्रत्युत्तरात उतरलेल्या आफ्रिकेला दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने धक्के दिले. फॉर्मात असलेल्या क्विंटन डी कॉकला ( १) पहिल्याच चेंडूवर स्लीपमध्ये लोकेशकरवी झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रिली रोसोवूसाठी LBW अपील झाले आणि रोहितने अगदी अखेरच्या क्षणाला DRS घेतला. सलग दोन सामन्यांत शतकी खेळी करणारा रोसोवू शून्यावर बाद झाला. कॅप्टन टेम्बा बवुमावर आज जबाबदारी होती आणि त्याने काही सुरेख फटकेही मारले. पण, मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्या षटकात ही विकेट मिळवून दिली. दिनेश कार्तिकने अप्रतिम झेल टिपला. आफ्रिकेला १० षटकांत ३ बाद ४० धावा करता आल्या.
त्यांना ६० चेंडूंत ९४ धावा विजयासाठी करायच्या होत्या. एडन मार्कराम व डेव्हिड मिलर ही जोडी तोडण्याची आयती संधी चालून आली होती, परंतु रोहितला रन आऊट करता आला नाही. मार्कराम बराच लांब होता आणि रोहितच्या डायरेक्ट हिटने आफ्रिकेला अडचणीत आणले असते. हार्दिक पांड्याने टाकलेल्या ११व्या षटकात मार्करामने १६ धावा जोडल्या. आर अश्विनच्या चेंडूवर मार्कराने मारलेला फटका विराटला सहज टिपता आला असता, पण त्याच्याकडून झेल सुटला. आर अश्विन व रोहित शर्मा यांनी डोक्यावर हात मारला. पुढच्या षटकात रोहितने पुन्हा रन आऊटची सोपी संधी गमावली.
Web Title: T20 World Cup, IND vs SA Live : HUGE MOMENT, Virat Kohli drops Aiden Markram, Rohit Sharma miss two easy run out opportunity, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.