T20 World Cup, IND vs SA Live : Virat Kohli चा रेकॉर्ड! Lungi Ngidiने चार विकेट्स घेत निम्मा संघ ४९ धावांत माघारी पाठवला, Video 

T20 World Cup, India vs South Africa Live Updates : अक्षर पटेलला बाकावर बसवून अतिरिक्त फलंदाजासह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाल पहिल्या दहा षटकांत मॅच फिनिशर दिनेश कार्तिकला मैदानावर पाहावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 05:23 PM2022-10-30T17:23:59+5:302022-10-30T17:24:26+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs SA Live : Lungi Ngidi has picked up 4 wickets, India 5 down for 49; Virat Kohli completed 1000 runs in the T20 World Cup history, Video  | T20 World Cup, IND vs SA Live : Virat Kohli चा रेकॉर्ड! Lungi Ngidiने चार विकेट्स घेत निम्मा संघ ४९ धावांत माघारी पाठवला, Video 

T20 World Cup, IND vs SA Live : Virat Kohli चा रेकॉर्ड! Lungi Ngidiने चार विकेट्स घेत निम्मा संघ ४९ धावांत माघारी पाठवला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs South Africa Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी हॅटट्रिक साजरी करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. अक्षर पटेलला बाकावर बसवून अतिरिक्त फलंदाजासह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाल पहिल्या दहा षटकांत मॅच फिनिशर दिनेश कार्तिकला मैदानावर पाहावे लागले. लुंगी एनगिडीने ( Lungi Ngidi) धडाधड चार धक्के देताना भारताचा निम्मा संघ  ४९ धावांत तंबूत पाठवला. कागिसो रबाडाने दोन अफलातून झेल घेतले. विराट कोहलीने १२ धावा करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, पण आफ्रिकेने वर्चस्व गाजवले. 

लोकेश राहुलचा फॉर्म ही भारतीयांची चिंता होतीच आणि तो ( ९) आजही अपयशी ठरला. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या लुंगी एनगिडीने पाचव्या षटकात रोहितला ( १५) बाद केले. तीन चेंडूंनतर एनगिडीने भारताला दुसरा धक्का देताना लोकेशला ( ९) माघारी पाठवले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहलीला अव्वल बनण्यासाठी २८ धावांची गरज होती आणि त्याने सुरेख फटकेही मारले. 

माहेला जयवर्धने ( श्रीलंका) - ३१ सामने, १०१६ धावांसह आघाडीवर आहे. विराटच्या २३ सामन्यांत ९८९ धावा झाल्या होत्या आणि आज त्याने १२ धावांची खेळी करून वर्ल्ड कपमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. लुंगी एनगिडीने त्यालाही बाऊन्सरवर फटका मारण्यास भाग पाडले आणि कागिसो रबाडाने बाऊंड्रीवर सुरेख झेल टिपला. एनगिडीने त्याचा तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याची ( २) विकेट घेतली. पुन्हा एकदा रबाडाने अफलातून झेल घेतला आणि भारताचा निम्मा संघ ४९ धावांत माघारी परतला. एनगिडीने चार विकेट्स घेतल्या.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: T20 World Cup, IND vs SA Live : Lungi Ngidi has picked up 4 wickets, India 5 down for 49; Virat Kohli completed 1000 runs in the T20 World Cup history, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.