T20 World Cup, IND vs SA Live : एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadavची वादळी खेळी, टीम इंडियाची वाचवली इभ्रत

T20 World Cup, India vs South Africa Live Updates : लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, दीपक हुडा व हार्दिक पांड्या हे ४९ धावांवर माघारी परतले..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 06:07 PM2022-10-30T18:07:23+5:302022-10-30T18:09:20+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs SA Live : Suryakumar Yadav played an outstanding innings of 68 in 40 balls, rescued India from a terrible situation, South Africa need 134 to defeat India | T20 World Cup, IND vs SA Live : एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadavची वादळी खेळी, टीम इंडियाची वाचवली इभ्रत

T20 World Cup, IND vs SA Live : एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadavची वादळी खेळी, टीम इंडियाची वाचवली इभ्रत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs South Africa Live Updates : लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, दीपक हुडा व हार्दिक पांड्या हे ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला. लुंगी एनगिडीने ४ महत्त्वाचे फलंदाज बाद करून भारताला मोठे धक्के दिले. पण, सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याही परिस्थितीत दडपणात आला नाही आणि तणाव न घेता त्याने वादळी खेळी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताला सन्मानजक धावसंख्या उभारता आली. एनगिडीने ४-०-२९-४ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. 

Virat Kohli चा रेकॉर्ड! Lungi Ngidiने चार विकेट्स घेत निम्मा संघ ४९ धावांत माघारी पाठवला, Video 


अक्षर पटेलला बाकावर बसवून अतिरिक्त फलंदाजासह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाल पहिल्या दहा षटकांत मॅच फिनिशर दिनेश कार्तिकला मैदानावर पाहावे लागले. लुंगी एनगिडीने ( Lungi Ngidi) धडाधड चार धक्के देताना भारताचा निम्मा संघ  ४९ धावांत तंबूत पाठवला. कागिसो रबाडाने दोन अफलातून झेल घेतले. लोकेश राहुलचा फॉर्म ही भारतीयांची चिंता होतीच आणि तो ( ९) आजही अपयशी ठरला. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या लुंगी एनगिडीने पाचव्या षटकात रोहितला ( १५) बाद केले. तीन चेंडूंनतर एनगिडीने भारताला दुसरा धक्का देताना लोकेशला ( ९) माघारी पाठवले. 


ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहलीला अव्वल बनण्यासाठी २८ धावांची गरज होती आणि त्याने सुरेख फटकेही मारले. माहेला जयवर्धने ( श्रीलंका) - ३१ सामने, १०१६ धावांसह आघाडीवर आहे. विराटच्या २३ सामन्यांत ९८९ धावा झाल्या होत्या आणि आज त्याने १२ धावांची खेळी करून वर्ल्ड कपमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. लुंगी एनगिडीने त्यालाही बाऊन्सरवर फटका मारण्यास भाग पाडले आणि कागिसो रबाडाने बाऊंड्रीवर सुरेख झेल टिपला.

 एनगिडीने त्याचा तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याची ( २) विकेट घेतली. पुन्हा एकदा रबाडाने अफलातून झेल घेतला आणि भारताचा निम्मा संघ ४९ धावांत माघारी परतला. एनगिडीने चार विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला आणि सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. सूर्यकुमारने त्याचा फॉर्म कायम राखताना यंदाच्या कॅलेंडर वर्षात १८०च्या स्ट्राईक रेटने ट्वेंटी-२०त ९००+ धावा पूर्ण केल्या. त्याने आज ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. वेन पार्नेलने सूर्या-कार्तिकची ५२ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. कार्तिक ६ धावांवर झेलबाद झाला. 


सूर्यकुमारला रोखणे आफ्रिकेच्या गोलंदाजांनाही जमत नव्हते आणि त्याला अश्विनची (७) चांगली साथ मिळाली होती. १९व्या षटकात पार्नेलने हे वादळ रोखले आणि सूर्यकुमार ४० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ६८ धावांवर माघारी परतला. भारताला ९ बाद १३३ धावा करता आल्या. वेन पार्नेलने १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: T20 World Cup, IND vs SA Live : Suryakumar Yadav played an outstanding innings of 68 in 40 balls, rescued India from a terrible situation, South Africa need 134 to defeat India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.