T20 World Cup, India vs South Africa Live Updates : लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, दीपक हुडा व हार्दिक पांड्या हे ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला. लुंगी एनगिडीने ४ महत्त्वाचे फलंदाज बाद करून भारताला मोठे धक्के दिले. पण, सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याही परिस्थितीत दडपणात आला नाही आणि तणाव न घेता त्याने वादळी खेळी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताला सन्मानजक धावसंख्या उभारता आली. एनगिडीने ४-०-२९-४ अशी उल्लेखनीय कामगिरी केली.
Virat Kohli चा रेकॉर्ड! Lungi Ngidiने चार विकेट्स घेत निम्मा संघ ४९ धावांत माघारी पाठवला, Video
अक्षर पटेलला बाकावर बसवून अतिरिक्त फलंदाजासह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाल पहिल्या दहा षटकांत मॅच फिनिशर दिनेश कार्तिकला मैदानावर पाहावे लागले. लुंगी एनगिडीने ( Lungi Ngidi) धडाधड चार धक्के देताना भारताचा निम्मा संघ ४९ धावांत तंबूत पाठवला. कागिसो रबाडाने दोन अफलातून झेल घेतले. लोकेश राहुलचा फॉर्म ही भारतीयांची चिंता होतीच आणि तो ( ९) आजही अपयशी ठरला. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या लुंगी एनगिडीने पाचव्या षटकात रोहितला ( १५) बाद केले. तीन चेंडूंनतर एनगिडीने भारताला दुसरा धक्का देताना लोकेशला ( ९) माघारी पाठवले.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहलीला अव्वल बनण्यासाठी २८ धावांची गरज होती आणि त्याने सुरेख फटकेही मारले. माहेला जयवर्धने ( श्रीलंका) - ३१ सामने, १०१६ धावांसह आघाडीवर आहे. विराटच्या २३ सामन्यांत ९८९ धावा झाल्या होत्या आणि आज त्याने १२ धावांची खेळी करून वर्ल्ड कपमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. लुंगी एनगिडीने त्यालाही बाऊन्सरवर फटका मारण्यास भाग पाडले आणि कागिसो रबाडाने बाऊंड्रीवर सुरेख झेल टिपला.
सूर्यकुमारला रोखणे आफ्रिकेच्या गोलंदाजांनाही जमत नव्हते आणि त्याला अश्विनची (७) चांगली साथ मिळाली होती. १९व्या षटकात पार्नेलने हे वादळ रोखले आणि सूर्यकुमार ४० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ६८ धावांवर माघारी परतला. भारताला ९ बाद १३३ धावा करता आल्या. वेन पार्नेलने १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"