टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा प्रेक्षक कधीच शांत बसत नाहीत. पण पर्थच्या मैदानावर विराट कोहलीने एक मोठी चूक केली आणि 60 हजार प्रेक्षक शांत आणि स्तब्ध दिसून आले. विराटच्या या चुकीनंतर संपूर्ण स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला होता. कारण विराट कोहलीच्या हातून एक साधा झेल सुटला होता. खरे तर, विराटकडून हातात आलेला झेल सोडण्याची अपेक्षाच केली जाऊ शकत नाही.
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आज पर्थच्या मैदानावर झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात आर अश्विन 12वे षटक फेकत होता. याच षटकाचा पाचवा चेंडूवर एडन मार्करमने डीप मिड विकेटला खेळला. तेथे विराट उभा होता. विराटच्या हातात एक सोपा झेल आला. पण त्याच्याकडून हा झेल सुटला. हे पाहून आर अश्विननही उदास झाला.
विराटच्या हातून हा झेल सुटल्यानंतर, जवळपास 60 हजार प्रेक्षकांनी भरलेल्या या मैदावार सर्वत्र एकच शांतता पसरली होती. यानंतर लगेचच पुढच्या षटकात रोहित शर्मानेही एक अत्यंत सोपा धावबाद करण्याची संधी सोडली. यामुळे भारतीय संघ दबावात आला आणि अखेर भारतीय संघाचा पराभव झाला. भारताच्या या पराभवामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा जवळपास धुळीस मिळाल्या आहेत.