T20 World Cup, IND vs SCO : टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शुक्रवारी सर्व आघाड्यांवर बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीला फलंदाजांनीही साजेशा साथ देताना कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) वाढदिवसाचं गिफ्ट दिलं. या सामन्यात लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाचा मान पटकावला. त्याची ही वादळी खेळी पाहण्यासाठी अभिनेत्री व भारतीय फलंदाजाची कथित गर्लफ्रेंड अथिया शेट्टी ( Atiya Shetty) हीपण VIP बॉक्समध्ये दिसली. राहुलनं अर्धशतकानंतर तिच्या दिशेनं बॅट उंचावली आणि तिनंही टाळ्या वाजवत दाद दिली. त्यामुळे हे गिफ्ट विराटसाठी की अथियासाठी असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत.
जसप्रीत बुमराहनं ३.४ षटकांत १० धावा देत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा ( ३-१५) नं ट्वेंटी-२०तील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तर मोहम्मद शमीनं ३ षटकांत १ निर्धाव षटक फेकताना १५ धावांत तीन विकेट्स घेतल्या. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्सी ( २४), मिचेल लिस्क ( २१) हे चांगले खेळले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर माघारी परतला. रोहित-राहुल जोडीनं चार षटकांत धावफलकावर अर्धशतकी धावा फडकवल्या. रोहित १६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३० धावांवर बाद झाला. राहुलनं १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. राहुलनं १९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा केल्या. भारतानं हा सामना ८ विकेट्स व ८१ चेंडू राखून जिंकला. भारतानं ६.३ षटकांत २ बाद ८९ धावा केल्या.
विराट कोहलीप्रमाणे अथियाचा आज वाढदिवस आहे.
Web Title: T20 World Cup, IND vs SCO : 'Gifting half-century to Athiya Shetty or Virat Kohli?': Netizens enjoy KL Rahul's 50 against Scotland in T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.