T20 World Cup, IND vs SCO Live Update : टीम इंडियासमोर स्कॉटलंडचा पालापाचोळा, विक्रमी विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेनं टाकलं मोठं पाऊल 

T20 World Cup, India vs Scotland Live Update : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 09:53 PM2021-11-05T21:53:43+5:302021-11-05T21:55:14+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs SCO Live Update : India chase down 86 runs against Scotland from just 6.2 overs, India (1.62) now has a better NRR Afghanistan (1.48) | T20 World Cup, IND vs SCO Live Update : टीम इंडियासमोर स्कॉटलंडचा पालापाचोळा, विक्रमी विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेनं टाकलं मोठं पाऊल 

T20 World Cup, IND vs SCO Live Update : टीम इंडियासमोर स्कॉटलंडचा पालापाचोळा, विक्रमी विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेनं टाकलं मोठं पाऊल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs Scotland Live Update : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं स्कॉटलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यानंतर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी तुफान  फटकेबाजी करताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. ही दोघं समोर आलेला प्रत्येक चेंडू सीमारेषेपार सहजतेनं टोलवंत होते. भारताला हा सामना ७.१ षटकांत जिंकायचा होता, परंतु त्यांनी त्यापेक्षा कमी षटकांतच बाजी मारून. नेट रन रेटमध्ये अफगाणिस्तानन्यूझीलंडलाही मागे टाकले. त्यामुळे आता अफगाणिस्तानन्यूझीलंडवर दडपण वाढले आहे.

तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरण्याचा विराट कोहलीचा ( Virat Kohli) निर्णय योग्य ठरला. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja)नं आज ट्वेंटी-२०तील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना स्कॉटलंडचे कंबरडे मोडले.  त्याला अन्य गोलंदाजांची चांगली साथ मिळाली. मोहम्मद शमी ( Mohammed Shami) पुन्हा स्टार ठरला आणि त्यानं सलग तीन विकेट्स घेतल्या परंतु यापैकी एक रन आऊट असल्यानं ही टीमची हॅटट्रिक ठरली. जसप्रीत बुमराहनं दोन विकेट्स घेत ट्वेंटी-२०त भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. 

जसप्रीत बुमराहनं ३.४ षटकांत १० धावा देत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा  (  ३-१५) नं ट्वेंटी-२०तील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तर मोहम्मद शमीनं ३ षटकांत १ निर्धाव षटक फेकताना १५ धावांत तीन विकेट्स घेतल्या. बुमराहनं ५४ सामन्यांत ६४ विकेट्स घेताना ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा मान पटकावला. युझवेंद्र चहल ६३ विकेट्ससह आघाडीवर होता. आर अश्विननं २९ धावांत १ विकेट घेतली. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्सी ( २४),  मिचेल लिस्क ( २१) हे चांगले खेळले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर माघारी परतला. 

टीम इंडियाला हे लक्ष्य ७.१ षटकांत पार करावे लागेल आणि तरच त्यांचा नेट रन रेट अफगाणिस्तापेक्षा वरचढ बनेल. त्यांनी ११.२ षटकांत  हे लक्ष्य पार केले, तर त्यांचा नेट रन रेट +१.०० असा होईल. ८.५ षटकं खेळल्यास त्यांचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा सरस ठरेल. 

लोकेश राहुलनं हे गणित डोळ्यासमोर ठेऊन सुसाट खेळ केला. रोहित शर्मा एका बाजूनं शांत उभा राहून राहुलची फटकेबाजी पाहत होता. लोकेशनं तिसऱ्या षटकात १६ धावा काढल्या. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहितची गाडी सुसाट पळाली आणि त्यानं चेंडू प्रेक्षकांमध्ये पोहोचवला. रोहित-राहुल जोडीनं चार षटकांत धावफलकावर अर्धशतकी धावा फडकवल्या.  ट्वेंटी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाची ही सर्वात जलद अर्धशतकी भागीदारी ठरली. रोहित १६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३०  धावांवर बाद झाला. राहुलनं १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

राहुलनं १९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा केल्या. ट्वेंटी-२०तील हे भारताकडून दुसरे जलद अर्धशतक ठरले. युवराज सिंगनं २००७मध्ये १२ चेंडूंत इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. २००९मध्ये गौतम गंभीरनं श्रीलंकेविरुद्ध १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं होतं. ( KL Rahul 50 off 18 balls - the second fastest in India's T20I history) भारतानं हा सामना ८ विकेट्स व ८१ चेंडू राखून जिंकला. भारतानं ६.३ षटकांत २ बाद ८९ धावा केल्या. 

NRR of India - +1.619 NRR of Afghanistan - +1.481 NRR of New Zealand - +1.277

Web Title: T20 World Cup, IND vs SCO Live Update : India chase down 86 runs against Scotland from just 6.2 overs, India (1.62) now has a better NRR Afghanistan (1.48)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.