T20 World Cup, IND vs SCO Live Update : स्कॉटलंडनं ठेवलेलं आव्हान टीम इंडियाला काही केल्या इतक्या षटकांत करावे लागेल पार, तर होईल चमत्कार!

T20 World Cup, India vs Scotland Live Update : कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) वाढदिवसाला नाणेफेक जिंकली आणि स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 07:45 PM2021-11-05T19:45:46+5:302021-11-05T19:57:05+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs SCO Live Update :  India today has to chase down the total in 11.30 overs get the NRR of  +1.00 and if they chase it today in 7.4 overs then can go ahead of Afghanistan.  | T20 World Cup, IND vs SCO Live Update : स्कॉटलंडनं ठेवलेलं आव्हान टीम इंडियाला काही केल्या इतक्या षटकांत करावे लागेल पार, तर होईल चमत्कार!

T20 World Cup, IND vs SCO Live Update : स्कॉटलंडनं ठेवलेलं आव्हान टीम इंडियाला काही केल्या इतक्या षटकांत करावे लागेल पार, तर होईल चमत्कार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs Scotland Live Update : न्यूझीलंडनं शुक्रवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आणि टीम इंडियाच्या अडचणीत वाढ केली. न्यूझीलंडच्या ४ बाद १६३ धावांचा पाठलाग करताना नामिबियाला ७ बाद १११ धावाच करता आल्या. या विजयासह न्यूझीलंडनं ६ गुण व १.२७७ नेट रन रेटसह ग्रुप २ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांच्या या कामगिरीनंतर टीम इंडियावर उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठीचं दडपण अधिक वाढलं आहे आणि आता त्यांना स्कॉटलंडविरुद्ध एक समीकरण पार करावे लागणार आहे.

कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) वाढदिवसाला नाणेफेक जिंकली आणि स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतीय संघानं उपांत्य फेरीचं गणित लक्षात ठेऊनच हा निर्णय घेतला. आजच्या संघात टीम इंडिया तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरली आहे. शार्दूल ठाकूरच्या जागी वरुण चक्रवर्थीचे संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्याच षटकात स्कॉटलंडचा सलामीवीर कायले कोएत्झरचा त्रिफळा उडवला.

भारताला या सामन्यात फक्त विजय पुरेसा नाही. त्यासाठी त्यांना एक समीकरण पूर्ण करावं लागेल. आज स्कॉटलंडनं किती धावांचे लक्ष्य ठेवलं तर ते टीम इंडियाला ७.४ षटकांत पूर्ण करावं लागेल आणि तरच ते नेट रन रेटमध्ये अफगाणिस्तानवर मात देऊ शकतील. जर टीम इंडियानं आजच्या सामन्यातील लक्ष्य ११.३ षटकांत पूर्ण केलं तर त्यांचा नेट रन रेट हा +१.०० येईल, परंतु त्यांना न्यूझीलंडच्या पराभवाची प्रतीक्षा पाहावी लागेल. अफगाणिस्ताननं जर तो सामना गमावला,तर पाकिस्तान व न्यूझीलंड हे ग्रुप २ मधून उपांत्य फेरीत खेळतील.    

समजा स्कॉटलंडनं आज १४० धावांचे लक्ष्य ठेवले तर

  • भारतानं हे लक्ष्य ७.४ षटकांत पूर्ण केलं, तर त्यांचा नेट रन रेट १.४८२ असा होईल
  • भारतानं १४ षटकांत विजय मिळवल्यास त्यांचा नेट रन रेट ०.७०८ असा होईल
  • भारताला १८ षटकं खेळावी लागली तर नेट रन रेट हा ०.३८६ असा राहील.

 

Web Title: T20 World Cup, IND vs SCO Live Update :  India today has to chase down the total in 11.30 overs get the NRR of  +1.00 and if they chase it today in 7.4 overs then can go ahead of Afghanistan. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.