T20 World Cup, IND vs SCO : मग बॅग पॅक करून घरी जाणार, आणखी काय?; सामन्यानंतर रवींद्र जडेजानं दिलेल्या उत्तरानं उडालाय गोंधळ, Video 

T20 World Cup, IND vs SCO : Toh fir bags pack karke ghar jaayenge, Ravindra Jadeja - भारतीय संघानं शुक्रवारी दुबळ्या स्कॉटलंडवर दिवाळी बोनससह विजय मिळवला. स्कॉटलंडला ८५ धावांत गुंडाळून टीम इंडियानं ६.३ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 11:16 PM2021-11-05T23:16:57+5:302021-11-05T23:18:12+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs SCO : Toh fir bags pack karke ghar jaayenge, Ravindra Jadeja on Question: If Afghanistan cannot beat New Zealand on Sunday, toh fir kya karenge?, Video  | T20 World Cup, IND vs SCO : मग बॅग पॅक करून घरी जाणार, आणखी काय?; सामन्यानंतर रवींद्र जडेजानं दिलेल्या उत्तरानं उडालाय गोंधळ, Video 

T20 World Cup, IND vs SCO : मग बॅग पॅक करून घरी जाणार, आणखी काय?; सामन्यानंतर रवींद्र जडेजानं दिलेल्या उत्तरानं उडालाय गोंधळ, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, IND vs SCO : Toh fir bags pack karke ghar jaayenge, Ravindra Jadeja - भारतीय संघानं शुक्रवारी दुबळ्या स्कॉटलंडवर दिवाळी बोनससह विजय मिळवला. स्कॉटलंडला ८५ धावांत गुंडाळून टीम इंडियानं ६.३ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. भारताचा नेट रन रेट आता न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांच्यापेक्षा सरस आहे. भारतानं आता ४ गुण व १.६१९ नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानी झेप घेत, अफगाणिस्तानला ( ४ गुण व १.४८१) चौथ्या क्रमांकावर ढकलले. ६ गुणांसह  दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचाही नेट रन रेट ( १.२७७) हा भारतापेक्षा कमीच आहे. पण, अजूनही भारताला उपांत्य फेरीत स्थान पटाकवण्यासाठी अफगाणिस्तानच्या ( Afghanistan) उपकाराची गरज आहे. त्यात स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीनंतर रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) घरी जाण्याची भाषा केल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं स्कॉटलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यानंतर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी तुफान  फटकेबाजी करताना भारताला दणदणीत विजय  जसप्रीत बुमराहनं ३.४ षटकांत १० धावा देत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा  (  ३-१५) नं ट्वेंटी-२०तील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तर मोहम्मद शमीनं ३ षटकांत १ निर्धाव षटक फेकताना १५ धावांत तीन विकेट्स घेतल्या.  स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्सी ( २४),  मिचेल लिस्क ( २१) हे चांगले खेळले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर माघारी परतला. 

रोहित-राहुल जोडीनं चार षटकांत धावफलकावर अर्धशतकी धावा फडकवल्या.  रोहित १६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३०  धावांवर बाद झाला. राहुलनं १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं.  ट्वेंटी-२०तील हे भारताकडून दुसरे जलद अर्धशतक ठरले. युवराज सिंगनं २००७मध्ये १२ चेंडूंत इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.  राहुलनं १९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा केल्या. भारतानं हा सामना ८ विकेट्स व ८१ चेंडू राखून जिंकला. भारतानं ६.३ षटकांत २ बाद ८९ धावा केल्या. 

या सामन्यानंतर रवींद्र जडेजा काय म्हणाला?

  • प्रश्न - जर रविवारी अफगाणिस्तान न्यूझीलंडला नमवण्यात अपयशी ठरले तर काय करणार?
  • उत्तर - मग बॅक पॅक करून घरी जाणार, अजून काय! 


Web Title: T20 World Cup, IND vs SCO : Toh fir bags pack karke ghar jaayenge, Ravindra Jadeja on Question: If Afghanistan cannot beat New Zealand on Sunday, toh fir kya karenge?, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.